शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा : जिल्ह्यात एक इंचही मोजणी न करण्याचा शेतकर्यांचा निर्धार
महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी वज्रमूठ

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा : जिल्ह्यात एक इंचही मोजणी न करण्याचा शेतकर्यांचा निर्धार
महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी वज्रमूठ
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी विजय राठोड यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात असल्याने.आगामी काळात राजकारण बाजूला ठेवून शक्तीपीठ महामार्गाला अधिक तीव्रतेने विरोध करून महायुती सरकारचा महामार्ग लादण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते हे सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली.

शक्तिपीठ महामार्गाविरोधात दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या विराट मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील 78 गावांमधून प्रस्तावित असलेल्या या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत महिला शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असल्याची घोषणा केली होती. ज्या निवडणुकीत त्यांनी राधानगरी भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ रद्द झाल्याची घोषणा केली होती त्याच तालुक्यातून सर्वाधिक जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी वज्रमूठ केली असून एक इंचही मोजणी न करण्याचा निर्धार या सभेतून करण्यात आला .
यावेळी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार जयंत पाटील , मा. आमदार संपतबापू पाटील , मा आमदार ऋतुराज पाटील , मा आमदार सत्यजित पाटील , शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष विजय देवणे, गिरीष फोंडे , कॅा. सम्राट मोरे , अजित पोवार , माळशिरस तालुक्यातील जि. प. सदस्य के के पाटील , ॲड. लक्ष्मण आबा मगर , जि.प. सदस्य मनोज फराकटे , हिंदुराव पाटील , बाळासाहेब खाडे , कॅा. संपत देसाई यांच्यासह विजय देवणे, ए.वाय. पाटील, राहुल देसाई, सत्यजित जाधव, सुनील शिंत्रे, अजित पोवार, धैर्यशील पाटील, राजेंद्र कवडे, सदाशिवराव चरापले, बाळासाहेब खडे, मनोज फराकटे, अतुल दिघे, संपत देसाई, उदय नारकर, गिरीश फोंडे, प्रकाश पाटील, राजू सूर्यवंशी, शामराव देसाई, सचिन घोरपडे, सम्राट मोरे, ए.डी. पाटील, हिंदुराव चौगले, बाबासो देवकर, पांडुरंग भांदिगरे, चंद्रकांत चौगले, विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती आजी माजी सदस्य मोर्चात सहभागी झाले होते.




