आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

संजीवन विद्यानिकेतनमध्ये नवागातांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न .

संजीवन विद्यानिकेतनमध्ये नवागातांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न .

पन्हाळा : प्रसाद जाधव / एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील संजीवन विद्याविहार या निवासी शिक्षण संकुलामधील संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेत मुलांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी नवागातांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता 

याप्रसंगी संस्थेचे सहसचिव एन .आर.भोसले , मुख्याध्यापक के .के .पोवार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले . त्यानंतर स्वागत गीताने सोहळ्याची सुरुवात झाली. इयत्ता पाचवी ते नववीच्या मुला मुलींनी सुंदर नृत्यविष्कार आणि गीतगायन केले कर्णमधुर गीतांनी आणि उत्कृष्ट नृत्याविष्कारांनी संजीवन दुमदुमले.

सहसचिव एन आर भोसले यांनी मुलांच्या अंगी असणार्‍या कलागुणांना नेहमीच संजीवनने प्रोत्साहन दिले आहे असे मत व्यक्त केले.मुख्याध्यापक के .के. पवार यांनी प्रास्ताविक केले.संस्थापक पी.आर. भोसले आणि क्रीडा संचालक सौरभ भोसले यांनीही या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या . 

हा सोहळा यशस्वी करण्यामध्ये संगीत विभागाचे मंगेश पैंजणे, धनंजय गुरव, शेखर खोत तसेच.एस. पाटील, नितीन गावडे ,स्मिता आयरे-गुजर ,चेतन पवार व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी,प्रांजली भोग आणि आकांक्षा पाटील यांनी केले तर आभार प्रसाद जाधव यांनी मानले .

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??