आपला जिल्हाताज्या घडामोडी

शेतकऱ्यांनी 150 ते 200 टन ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यप्रवण व्हावे : उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन –

शेतकऱ्यांनी 150 ते 200 टन ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यप्रवण व्हावे :


उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन –

शिरोळ/ एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांनी 150 ते 200 टन ऊस उत्पादन घेण्याची दृष्टी ठेवून काम करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. पाण्याचे सुयोग्य नियोजन, सेंद्रिय कर्बाचे वाढविण्यासाठीचे प्रयत्न आणि तीन वर्षातून एकदा माती परीक्षण करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांना श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून चर्चासत्रे, मेळाव्यांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा आणि सेंद्रिय कर्ब 0.85 ते 1% पर्यंत वाढवण्यासाठी वैयक्तिक व सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. श्री दत्त कारखान्याच्या वतीने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न होत असून शेतकऱ्यांनी क्षारपड मुक्तीसाठी उभ्या केलेल्या संस्थांना शासना कडून अनुदान मिळवण्यात येणाऱ्या अडीअडचणी, समस्यांचा विचार करून त्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

महालिंग पाटील, प्रवीण सूर्यवंशी, आप्पासाहेब पाटील, विनायक नरुटे, सतपाल खोंद्रे, के. आर. पाटील, गजानन गाताडे, सुभाष शहापुरे, शिरीष कागले, नंदकिशोर पाटील, बुद्धीराज पाटील यांच्यासह विविध भागातील शेतकऱ्यांनी क्षारपड मुक्तीसाठी आतापर्यंत झालेले काम, आलेल्या अडचणी, त्यावर प्रयत्नपूर्वक केलेली मात आणि यासाठी गणपतराव पाटील यांचे मिळालेले सहकार्य व मार्गदर्शन यांचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी क्षारपडचे काम पूर्णत्वास गेले असून विविध पिके येत असल्याने आर्थिक नफा होत आहे. दादांच्यामुळे शेतकऱ्यांना फक्त फायदाच होत नसून त्यांना नवी ऊर्जाही मिळत आहे. जयसिंगपूर उदगाव बँक, वीरशैव बँकांच्या माध्यमातून गणपतराव पाटील यांनी क्षारपड मुक्तीसाठी उपलब्ध करून दिलेल्या कर्जाची शेतकऱ्यांनी दोन वर्षांमध्येच परतफेड करण्यामध्ये यश मिळवले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यामध्ये क्षारपड मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे गणपतराव पाटील हेच शेतकऱ्यांच्या मनातील भाग्यविधाते असून त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सर्व शेतकऱ्यांनी गणपतराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पर्यावरण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, साथी हसन देसाई, महेंद्र बागे, ॲड. प्रमोद पाटील, भैय्यासाहेब पाटील, कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे यांच्यासह सुमारे 24 गावातील क्षारपड जमीन सुधारणा संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आभार ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??