अंबाई टॅन्क प्रभागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही : नगरसेवक शारंगधर देशमुख.
आम्रपाली अपार्टमेंट येथे अंतर्गत सिमेंट काँक्रिटकरणाच्या कामाचा शुभारंभ

अंबाई टॅन्क प्रभागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही : नगरसेवक शारंगधर देशमुख.
आम्रपाली अपार्टमेंट येथे अंतर्गत सिमेंट काँक्रिटकरणाच्या कामाचा शुभारंभ
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
प्रभाग क्रमांक 9 अंबाई टॅन्क येथे आम्रपाली अपार्टमेंट येथे अंतर्गत सिमेंट काँक्रिटकरणाच्या कामाचा नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या कामासाठी श्री भगवान पाटील अणि धनंजय भुतकर यांनी पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे आम्रपाली अपार्टमेंट मधील सर्व रहिवाशांनी आभार मानले.
कार्यक्रमास राहूल जाधव, इंद्रजित शेट्टी, रणधीर चव्हाण, संदीप पाटील, विपुल कांदेकर, प्रमोद जगताप, दिलीप जाधव, भगवान जाधव, सचिन बांदेकर,नलवडे , हुक्केरिकर , उमेश घळसासी तसेच अश्विनी पाटील, वर्षा भुतकर व अपार्टमेंट मधील सर्व महिला अणि भागातील नागरिक उपस्थित होते.
मोबाईल ग्रुपतर्फे उपस्थितांचे आभार मानण्यात आले. देशमुख यांनी आपल्या भाषणात प्रभागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही तसेच येणाऱ्या काळात सर्व अंबाई टॅन्क परिसरातील रस्ते कामासाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर असून लवकरच रस्त्याचे काम चालू होणार आहे. या अनुषंगाने सर्व बिल्डिंग धारकांनी आपल्या इमारतीॅचे ड्रेनैज पाइप टाकून घ्यावे असे आवाहन यावेळी बोलताना केले.



