उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा
गारगोटी: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे आज दि. ९ जून 2026 रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर मॅडम यांच्या संकल्पनेतून, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दहा वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. पटवेकर सर यांनी गरोदर मातांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी, करावयाच्या तपासण्या, नियमित औषधोपचार तसेच गरोदरपणातील गंभीर व धोक्याची लक्षणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी गरोदरपणातील पोषक आहार व त्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.ज्ञानेश्वर हावळ सर यांनी गरोदरपणातील आवश्यक त्या टप्प्यावर केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीचे महत्व, संदर्भ सेवेचे महत्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता शेट्टी यांनी केले.आभार ICTC विभाग समुपदेशक जयवंत सावंत यांनी मानले.या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली खोत व डॉ. देसाई मॅडम उपस्थित होत्या.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कार्यक्रमाला ९ जून २०२६ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली म्हणून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात एकूण ४० गरोदर मातांची तपासणी करण्यात आली.एकूण 25 गरोदर मातांची सोनोग्राफी करण्यात आली. या सर्व मातांची CBC, BLOOD GROUP, VDRL TEST, HIV TEST THALASSEMIA TEST तसेच रक्तलघवीच्या इतरही तपासण्या करण्यात आल्या. त्यातून ९ जोखमीच्या मातांची ( High Risk ANC) नोंदणी झाली. या सर्व मातांना Folic Acid, Iron, Calcium औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच या सर्व लाभार्थीना गूळ शेंगदाणा चिक्की व राजगिरा लाडू या पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.
अनिता जाधव , मुल्ला, गोकुळा पाटील यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.यावेळी उपजिल्हा रुग्णालयचा नर्सिंग स्टाफ,इतर स्टाफ,अंगणवाडी व आशा वर्कर्स उपस्थित होत्या.



