खासगी क्लासेस ही काळाची गरज-अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर

खासगी क्लासेस ही काळाची गरज-अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर
सांगली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
आज खासगी क्लासेस ही काळाची गरज आहे. कारण घरातील आईवडील दोघेही अर्थार्जनासाठी कामावर जातात तेव्हा मुलांच्या अभ्यासाची तयारी करून घेणारे खाजगी क्लासेस ही अपरिहार्य गरज बनते. असे मत कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन व सोशल फोरमने आयोजित केलेल्या पदग्रहण व गुणीपाल्य सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगली जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक सौ कल्पना बारवकर यांनी व्यक्त केले .
समाजातील सगळ्यात स्वछ प्रतिमा असणारा घटक म्हणजे शिक्षक अनेक पिढ्या घडवण्याचे तो काम करतो. पण आज काही अपप्रवृत्ती ही प्रतिमा मलीन करत आहेत. आज विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवण्यासाठी अनेक सुसंधी आहेत. त्यासाठी कष्ट, निष्ठा व स्वतःला झोकून देण्याची तयारीं हवी असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बसवराज हिरेमठ हे होते. तर राज्य सल्लागार संजय कुलकर्णी, राज्य समन्व्यक प्रताप गस्ते, राज्य कार्याध्यक्ष गणेश जोशी उपस्थित होते. सुरवातीस सचिव राजू पाटील यांनी अहवाल वाचन केले तर खजिनदार सुनील कुलकर्णी यांनी जमाखर्च व ताळेबंद सादर केला. मावळते जिल्हा अध्यक्ष रावसाहेब हल्लोळे यांनी आपले अध्यक्षपद बसवराज हिरेमठ यांच्याकडे सोपवले.
राज्य कार्याध्यक्ष गणेश जोशी यांनी प्रास्ताविक केले, रावसाहेब हल्लोळे यांनी आपल्या कामाचा तपशील सांगितला तर राज्य जेष्ठ सल्लागार संजय कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नवीन कार्यकारणी व गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला . बसवराज हिरेमठ यांनी आपल्या कालखंडात शिक्षणक्षेत्रात सांगली पॅटर्न तयार करून तो राज्यात लोकप्रिय करु असे अभिवचन दिले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आर. बी. पाटील , भीमराव धुळूबुळू व जिल्ह्यातील क्लास चालक उपस्थित होते जिल्हा समन्वयक सूर्यकांत तवटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर चंद्रकांत चौगले यांनी आभार मानले.




