युवा गझलकारांसाठी गझल मंथन साहित्य संस्थेची मोफत कार्यशाळा

युवा गझलकारांसाठी गझल मंथन साहित्य संस्थेची मोफत कार्यशाळा
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

गझलेचा प्रचार व प्रसार करण्यात अग्रेसर असलेल्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने युवा गझलकारांसाठी लवकरच विशेष गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या युवा गझल स्पर्धा आणि अखिल भारतीय युवा गझल संमेलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हा अभिनव राबविण्यात येत आहे.
गझल मंथन साहित्य संस्थेच्या असे निदर्शनास आले की, स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक नवोदित कवींमध्ये लेखनक्षमता असूनही त्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शनाची गरज असल्याचे जाणवले. त्यामुळे काही गुणवंत कवी पहिल्या युवा गझल संमेलनापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि नवोदितांना निर्दोष गझल लेखनाचे प्रशिक्षण देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यशाळेचे प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ गझलकार डॉ. शिवाजी काळे आणि डॉ. स्नेहल कुलकर्णी कार्यभार सांभाळणार आहेत. कार्यशाळेचा कालावधी एक वर्षाचा असून ती पूर्णतः निःशुल्क राहणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक युवा गझलकारांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन इनामदार, उपाध्यक्ष धनंजय पाटील व जिल्हा सचिव सारिका पाटील यांनी संस्थेच्या वतीने केलेले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी
चेतन पवार (९६०४२४२३३४),
सुधीर महाजन (९२७३७७७५१४),
व प्रणाली म्हात्रे (८७७९८७९४४६)
यांच्याशी इच्छुकांनी संपर्क साधावा .
गझल लेखनाची आवड असलेल्या युवा पिढीसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरणार आहे.



