संजीवन विद्यालयात विद्यार्थ्यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात जल्लोषमय स्वागत

संजीवन विद्यालयात विद्यार्थ्यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात जल्लोषमय स्वागत
पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन विद्यालय या निवासी प्रशालेत नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत विविध अभिनव उपक्रमांनी करण्यात आले.

याप्रसंगी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या व जुन्या विद्यार्थ्यांचेही औक्षण करून त्यांची लेझीम व हलगी या पारंपरिक वाद्यांच्या गजरात,सजवलेल्या अश्वांसह वसतिगृहापासून शालेय इमारतीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली तर प्रशालेच्या इमारतीमध्ये फुलांच्या पायघड्या घालून सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व शुभेच्छापत्र देऊन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच खास बनवलेल्या सेल्फी पॉईंटवर सर्व विद्यार्थ्यांनी आपले फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
प्रशालेचे प्राचार्य महेश पाटील यांनी नवशैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व दैनंदिन शालेय कामकाज, प्रशालेतील विविध उपक्रम व शालेय शिस्त याबद्दल विद्यार्थ्यांना परिचित केले व वर्षभर बिनभिंतीची शाळा या उपक्रमांतर्गत विविध नवनवीन उपक्रमांची रेलचेल विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी वरीष्ठ समन्वयक सचिन इनामदार, कनिष्ठ समन्वयक सुगंध देवकुळे,आनंद पाटील, क्रीडा व वसतिगृह प्रमुख सागर पाटील,जालिंदर पाटील, दीपक भिसे, शकुंतला कुंभार,स्मिता पाटील,नीता पाटील, विवेक कांबळे, अमोल सुतार,किरण पाटील,शेखर खोत व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पहिल्या दिवशीच प्रशालेकडून झालेल्या या स्वागताने सर्व विद्यार्थी आनंदाने भारावून गेलेले होते. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन डॉ. पी. आर.भोसले सहसचिव एन. आर.भोसले,क्रीडा संचालक सौरभ भोसले यांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांचे संजीवन ज्ञानसंकुलात स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन धनंजय पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंदानी विशेष परिश्रम घेतले.



