ताज्या घडामोडी

अखिल भारतीय स्पर्धेसाठी कथा पाठवण्याचे आवाहन

अखिल भारतीय स्पर्धेसाठी कथा पाठवण्याचे आवाहन

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे स्व. आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे .पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .कथा स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून प्रामुख्याने नवोदित कथाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येते.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस रुपये 3000 मानपत्र व स्मृतिचिन्ह असे असून दुसरे बक्षीस रुपये 2000 मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे. तिसरे बक्षीस रुपये 1000 मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे .

याशिवाय तीन विशेष उल्लेखनीय कथांना रुपये पाचशेचे बक्षीस मानपत्र व सृतिचिन्ह ,उत्तेजनार्थ तीन कथांना रुपये पाचशे मानपत्र व स्मृतिचिन्ह आणि स्थानिक उत्तेजनार्थ तीन बक्षिसे रुपये पाचशे मानपत्र व सृतिचिन्ह चिन्ह याप्रमाणे एकूण बारा बक्षिसे दिली जाणार आहेत.

लेखकांनी आपल्या कथा पोस्टाने किंवा ईमेलवर श्रीलिपी,पीडीएफ स्वरूपात खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात .कथेसाठी शब्द मर्यादा 2000 शब्दांच्या पर्यंत आहे .कथेसोबत आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे .

कथा 15 ऑगस्ट 2026 पूर्वी पाठवाव्यात .कथेसाठी विषयांचे बंधन नाही पण अश्लील किंवा वादग्रस्त कसा स्वीकारल्या जाणार नाहीत .परीक्षकांचा निकाल अंतिम राहील .विजेत्यांना निकाल कळविण्यात येईल. विजेत्या व अन्य निवडक कथा साहित्य सहयोग दिवाळी अंकात प्रकाशित होतील असे संयोजकांकडून कळविण्यात आले आहे .

कथा पाठवण्याचा पत्ता –

सुनील इनामदार

साहित्य सहयोग दीपावली 5475 समतानगर मु.पोस्ट तालुका – शिरोळ  जिल्हा कोल्हापूर पिनकोड नंबर 416103

ईमेल आयडी sahityasahayog@gmail.com.                संपर्क क्रमांक 9850247767 

या स्पर्धेत अधिकाधिक कथाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??