साहित्य सहयोगच्या 23 व्या दीपावली अंकाचे प्रकाशन
साहित्य सहयोगच्या 23 व्या दीपावली अंकाचे प्रकाशन

साहित्य सहयोगच्या 23 व्या दीपावली अंकाचे प्रकाशन
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

गेली 23 वर्षे साहित्य सेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवलेल्या साहित्य सहयोग च्या 23 व्या दीपावली अंकाचे प्रकाशन श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भाट व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर पार पडले.
नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने साहित्य सहयोग दीपावली अंकाची सुरुवात करण्यात आली. साहित्य सहयोग च्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून कथा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षापासून स्व. आमदार, डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती मराठी कथा स्पर्धांचे आयोजन केले जात असून यंदा स्पर्धेतील यशस्वी 15 साहित्यिकांना स्व. सा. रे. पाटील यांच्या स्मृती दिनी गौरविण्यात येणार आहे.
राज्य पातळीवर सुरू झालेल्या कथा स्पर्धाना आज अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले असून ही कथा स्पर्धा देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही पोहोचली आहे. 2025 च्या या दीपावली अंकामध्ये कथा स्पर्धेतील कथाकारांच्या शिवाय नामवंतांच्या निमंत्रित कथा, कुटुंब संस्थेचे भवितव्य याविषयी विविध साहित्यिकांचे लेख, गजलोत्सव, विशेष लेख, पुस्तक परीक्षण, चारोळ्या अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. साहित्य सहयोग दीपावलीचा हा अंक साहित्य प्रेमींना निश्चितच आवडेल असा आशावाद संपादक सुनील इनामदार यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ पाटील, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु गावडे, ज्योतीकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, इंद्रजीत पाटील, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, कार्यकारी संचालक महादेव पाटील, इंद्रधनुष्य कार्यकारी संपादक संजय सुतार, प्रदीप बनगे, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, श्याम वाघमोडे, सचिन साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


