प्रवासी वाहनांची विक्री ३५ टक्क्यांनी वाढली सणासुदीच्या काळाचा वाहन व्यवसायाला बुस्टर

ऑटो न्यूज:
प्रवासी वाहनांची विक्री ३५ टक्क्यांनी वाढली
सणासुदीच्या काळाचा वाहन व्यवसायाला बुस्टर
सचिन इनामदार (कार्यकारी संपादक)
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
यंदाच्या नवरात्रीत प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात सप्टेंबर महिन्यात ३५ टक्क्यांनी जास्त गाड्या विकल्या गेल्या असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे दिवाळीपर्यंत विक्रीची ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.प्रवासी वाहनांची विक्री ३५ टक्क्यांनी वाढली सप्टेंबर २०२५ मध्ये देशभरातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत २,१९,५७२ युनिट्सची वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या १,६२,१४४ होती. नवरात्री आणि दसरा या सणांच्या मुहूर्तावर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी केली. यामुळे वाहन निर्मात्यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येते आहे.
एसयूव्ही आणि डिझेल गाड्यांना जास्त मागणी: संपूर्ण भागात सर्वात जास्त मागणी एसयूव्ही आणि डिझेल प्रवासी वाहनांना लाभली आहे. एरव्ही तुलनेत शहरांत आणि ग्रामीण भागांत एसयूव्ही सेगमेंटचे आकर्षण खूप वाढल्याचे दिसून आले. या विभागात विक्रीमध्ये ४६,२०४ युनिट्सची वाढ नोंदली गेली. मागील वर्षी सप्टेंबरच्या तुलनेत हे प्रमाणसुद्धा मोठे असून, एसयूव्ही खरेदीचा कल ग्राहकांचा स्पष्टपणे जाणवतो आहे.
टॉप देशी-विदेशी कंपन्यांना फायदा :
सप्टेंबर महिन्यात विविध देशी व विदेशी कंपन्यांनी आपल्या नवीन मॉडेल्सचे लाँचिंग केले होते. यात मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, टोयोटा या ब्रॅण्ड्सच्या गाड्यांना विशेष प्रतिसाद मिळाला. तसेच इलेक्ट्रिक वाहन विक्रीत देखील वाढ नोंदवली गेली आहे. इलेक्ट्रीक व हायब्रिड वाहनांसाठी अतिरिक्त आकर्षक ऑफर्स आणि सवलती मिळाल्याने ग्राहकांचा कल या पर्यावरणपूरक वाहनांकडे वळला आहे.
दिवाळीपर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता सणासुदीच्या हंगामात नजीकच्या काळात, विशेषतः दिवाळीपर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाहन डिलरशीपकडूनही अनेक आकर्षक योजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या काही आठवड्यांतही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर गाड्यांची मागणी राहील, असा अंदाज वाहन व्यवसाय संबंधितांनी व्यक्त केला आहे.
मुख्य आकडेवारी सप्टेंबर २०२५ मध्ये प्रवासी वाहन विक्री:
एकूण विक्री – २,१९,५७२ युनिट्स
मागील वर्षी सप्टेंबर – १,६२,१४४ युनिट्स
वाढ – ५७,४२८ युनिट्स (३५ टक्के वाढ)
एसयूव्ही विक्री एकूण
एसयूव्ही विक्री – १,१४,४५२ युनिट्स
मागील वर्षी – ७७,६५९
युनिट्स वाढ – ३६,७९३ युनिट्स (४७ टक्के वाढ)
टॉप वाहन ब्रँड्स
मारुती – ८३,८५७ युनिट्स
ह्युंदाई – ५१,८२१ युनिट्स
टाटा – ४८,७८२ युनिट्स
महिंद्रा – ४९,७७९ युनिट्स
टोयोटा – २४,६६४ युनिट्स
इलेक्ट्रिक वाहन विक्रीवाढ – १२ टक्के
एकूण प्रवासी वाहने २,१९,५७२ युनिट्स
(सप्टेंबर २०२५)१,६२,१४४ युनिट्स
एकंदरीतच जी. एस. टी. कपात अणि वाहन कंपन्यांनी दिलेल्या आकर्षण सवलतींचा फायदा ग्राहकांनी उचलला असून पूर्वीच्या काही महिन्यांपूर्वी असणारी बाजारातील मरगळ झटकून जोरदार विक्रीचा धडाका चालू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. येणारी दिवाळी देखील वाहन कंपन्यांना अधिक शुभ राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


