ब्रेकिंग न्यूज* उत्तरकाशी, धराली येथे ढगफुटी. • खीरगंगा नदीला मोठा पूर, गावात गाळात अडकून मोठ्या प्रमाणात घरं-दुकाने यांचे नुकसान.

ब्रेकिंग न्यूज*
उत्तरकाशी, धराली येथे ढगफुटी.
• खीरगंगा नदीला मोठा पूर, गावात गाळात अडकून मोठ्या प्रमाणात घरं-दुकाने यांचे नुकसान.
एन. वाय. नवा भारत न्यूज लाईव्ह*
उत्तरकाशी, धराली येथे ढगफुटी.
• खीरगंगा नदीला मोठा पूर, गावात गाळात अडकून मोठ्या प्रमाणात घरं-दुकाने यांचे नुकसान.
• किमान ६० जण बेपत्ता, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले.
• २०-२५ हॉटेल्स, अनेक होमस्टे प्रभावीत/नष्ट.
• बचावकार्य एसडीआरएफ, एनडीआयआरएफ व सैन्याच्या मदतीने सुरू.
• वाहतूक, पूल तुटले, संपर्क तुटला.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री परिसरातील धराली गावात ५ ऑगस्ट २०२५ रोजी ढगफुटीची मोठी दुर्घटना घडली असून या घटनेमुळे खीरगंगा नदीला अचानक मोठा पूर आला आणि जोरदार वेगाने गावात शिरला. काही सेकंदांत अनेक घरं, दुकानं, हॉटेल, होमस्टे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.
पूर व चिखलात अनेक जण घरांखाली, ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. ६० पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्याची शक्यता आहे.अंदाजे २० ते २५ हॉटेल आणि होमस्टे या पूरात वाहून गेले आहेत. SDRF, NDRF, सेना आणि पोलीस यांचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
खीरगाड नाल्याच्या पाणीपातळीमध्ये प्रचंड वाढ झाली, त्यामुळे जवळची वाहतूक, पायवाटा, पूल ही वाहून गेले, परिणामी रस्ते संपर्कही तुटला आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून सर्व प्रशासन आणि बचाव दल तातडीने कार्यरत असल्याचे सांगितले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी x वरून याबाबत मदतकार्य सुरू केले असल्याचे सांगितले आहे.