शिरोळचे अनिलकुमार हेळकर आदर्श तहसीलदार पुरस्काराने सन्मानित*

शिरोळचे अनिलकुमार हेळकर आदर्श तहसीलदार पुरस्काराने सन्मानित*
शिरोळ: एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना आदर्श तहसीलदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक ऑगस्ट महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हेळकर यांचा गौरव करण्यात आला.जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत गेल्या वर्ष – दीड वर्षांमध्ये त्यांनी सर्वच विभागात चांगले प्रशासकीय कामकाज केले आहे.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी शिरोळ नियुक्तीनंतर शिरोळ तालुक्यातील महापूर परिस्थिती व
तालुक्याचा बारकाईने अभ्यास करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष कार्य केले आहे. प्रशासकीय कामकाजात गौण खनिज कारवाई, प्रत्येक गावातील जुने दप्तर तालुक्यात जमा करणे,ऑनलाईन वसुलीसाठी शंभर टक्के गावे, फार्मर आय डीचे कामकाज पूर्ण ,पी.एम.किसान योजनेचे प्रलंबित कामकाज निर्गत, अतिक्रमित पानंद रस्ते खुले करणे यासह संजय गांधी लाभार्थी तपासणी मोहिमेतून पात्र लाभार्थ्याला लाभ मिळवून देणे,जुने रेकॉर्ड याचे बल्क साईंनीग करणे,ई-कोर्टचे कामकाज फोर्टल माहिती भरणे,गावे D-4 करणे यासह दैनंदिन शासकीय कामातील सातत्य तसेच सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य दिले आहे, या कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शिरोळ तहसीलदार हेळकर यांना “आदर्श तहसीलदार ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .