आपला जिल्हाताज्या घडामोडी

संजीवन ज्ञानसंकुलामध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहामध्ये संपन्न.

संजीवन ज्ञानसंकुलामध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहामध्ये संपन्न.

पन्हाळा : एन. वाय. नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन ज्ञानसंकुलामध्ये 79 वा भारतीय स्वातंत्र्य सोहळा उत्साहात संपन्न झाला.
संजीवन शिक्षण समूहाचे अध्यक्ष पी.आर.भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर राष्ट्रगीत, झेंडा गीत आणि राज्यगीताने वातावरण राष्ट्रभक्तीमय झाले.
त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक संचलनाने उपस्थितांना मानवंदना दिली. याप्रसंगी शिक्षिका विद्या साळोखे यांनी यावर्षीच्या शौर्य पुरस्कारांचे वाचन केले.

संजीवन संगीत विभागाच्या बाल कलाकारांनी सुमधूर राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली.

संजीवन पब्लिक स्कूल डे सेक्शनच्या प्री प्रायमरीच्या चिमुकल्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून कृष्ण जन्माची सुंदर नाटिका सादर केली.

सोहळ्याचे औचित्य साधून संजीवन पब्लिक स्कूल मधील इयत्ता नववीचा रायफल शूटिंग मध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेला विद्यार्थी शब्द भिसे आणि साऊथ झोन टू यांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या 14 आणि 17 वर्षांखालील राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी निवड झालेल्या हॉकी संघाचे अभिनंदन करण्यात आले.

या सोहळ्याला संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव एन. आर. भोसले, आणि कार्यकारी संचालक सौरभ भोसले व बी. आर. बेलेकर, पी. एन. पाटील, के. के. पोवार, महेश पाटील, शिल्पा सांगावकर-पाटील, डॉ. संजीव जैन हे विविध ज्ञान शाखांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

सोहळ्याचे संगीत संयोजन संगीत विभाग प्रमुख धनंजय गुरव तसेच मंगेश पैंजणे, शेखर खोत आणि कौस्तुभ शिंदे यांनी केले.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी संचलनाची धुरा प्रशिक्षक सागर पाटील, संदीप जाधव आणि विश्वास घाटगे यांनी सांभाळली.

सोहळ्याचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी आणि पांडुरंग गांजवे यांनी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??