दिंडेवाडी येथे संस्कार शिबीर व पालक मेळावा
समाज सुदृढ ठेवण्यासाठी तरुणांनो व्यसनापासून दूर रहा.
– राजेंद्र यादव
सिंहवाणी ब्युरो / पिंपळगाव
युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले असून समाज सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.पालकांनी आपल्या मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत.असे प्रतिपादन व्याख्याते राजेंद्र यादव यांनी केले.
ते दिंडेवाडी ता भुदरगड येथील शंकर चक्रू पाटील माध्यमिक विद्यालयात संस्कार शिबीर व पालक मेळावा या संयुक्त कार्यक्रमात व्यसनमुक्ती या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शंकर येजरे होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र भामरल, संभाजी जाधव, जयश्री फराक्टे,लता भोईटे, संतोष धावडे, अशोक कदम, प्रदीप अडसूळ, सोनाली रेडेकर,आरती रामाणे,सारिका फराक्टे, राजेंद्र भोईटे,धनाजी काशिदकर, शशिकांत फराक्टे, संतोष पाथरवट, सुधीर शिऊडकर, ज्ञानदेव घाटगे, सदाशिव शेटके, बळवंत ढेकळे, धनाजी काशिदकर यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुधाकर मुळीक यांनी केले.आभार शशिकांत फराक्टे यांनी मानले.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??