बातम्या शिरोळच्या शिरोळच्या विद्यार्थिनींकडून देशभक्तीपर लेझीम सादरीकरण

बातम्या शिरोळच्या
शिरोळच्या विद्यार्थिनींकडून देशभक्तीपर लेझीम सादरीकरण
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
*मौजे आगर येथे डॉ आंबेडकर शासकीय वस्तीगृह, निवासी शाळेत डॉ दगडू माने यांच्या हस्ते धजवंदन*
— मौजे आगर ( ता शिरोळ ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह व निवासी शाळेच्या प्रांगणात शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व राज्य शासन समाजभूषण डॉ दगडू श्रीपती माने यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वसतिगृह अधीक्षक डॉ. उत्तम कोळी , मुख्याध्यापक प्रदीप जवाहिरे, गृहपाल बी जे खोडके, सहाय्यक शिक्षक कुणाल कांबळे , राहुल गुडीमणी , अकीब मुजावर, सम्मेद पाटील , माया कांबळे, रावसाहेब भोसले, सचिन कमलाकर यांच्यासह विद्यार्थी, पालक व कर्मचारी उपस्थित होते……
कन्या विद्या मंदिर क्र. २ शिरोळच्या विद्यार्थिनींकडून देशभक्तीपर लेझीम सादरीकरण
स्वातंत्र्य दिनानिमित्त शिरोळ येथील कन्या विद्या मंदिर क्र. २ या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी सार्वजनिक ध्वजारोहण सोहळ्यात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात देशभक्तीपर गीतावर लेझीम खेळत एक अद्वितीय व प्रेरणादायी सांस्कृतिक परंपरेचे सादरीकरण केले.
शुक्रवारी पाऊस पडत असतानाही या लहानग्या विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने आणि देश प्रेमाने भरलेली लेझीम सादर केले. त्यांच्या नृत्य व तालाची आणि एकसंघतेला उपस्थितीत नागरिकांनी दाद दिली. ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित असणाऱ्यांची मने जिंकणाऱ्या या सादरीकरणाने एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली.
कन्या विद्या मंदिर क्र.२ शाळेच्या नावाला प्रतिष्ठा मिळवून देणे, विद्यार्थ्यांना विविध संस्कृती, शैक्षणिक उपक्रमात सहभाग करून घेणे आणि शाळेची पटसंख्या वाढवणे तसेच चांगल्या गुणवत्तेची शिक्षणासाठी प्रयत्न करणे. हे या शाळेचे उद्दिष्ट राहिले आहे. आणि त्याकडे यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे.
या वेळी सर्व विद्यार्थिनी, शाळेचे मुख्याध्यापक घोळवे, सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रबोधिनीत ध्वजारोहण
इचलकरंजी
समाजवादी प्रबोधिनी, प्रबोधन वाचनालय आणि चंद्रशीला कॉमर्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी प्रबोधिनीच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम अपराध यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी तुकाराम अपराध, ईश्वरी पाटील आणि देवराज चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली. उज्वला जाधव यांनी प्रेरणादायक कविता सादर केली. यावेळी प्रसाद कुलकर्णी , प्रा. रमेश लवटे ,दयानंद लिपारे,पांडुरंग पिसे, शकील नदाफ, आनंदसा खोडे,सद्दामहुसेन कारभारी, अब्दुल नदाफ, सतीश कांबळे, पूजा आगर, मनोहर जोशी, भीमराव नायकवडी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्राची चौगुले यांनी सूत्रसंचलन केले.