डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या ‘दिशांतर’ गझलसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या ‘दिशांतर’ गझलसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल विनय कुलकर्णी यांच्या ‘दिशांतर’ या गझलसंग्रहाला
अश्वमेघ ग्रंथालय व वाचनालय सातारा यांच्या वतीने देण्यात येणारा कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ ‘राज्यस्तरीय’ अक्षरगौरव साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार आ. डॉ. संदीप सांगळे सर अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या हस्ते, मा. विशाल कदम संवाद व पटकथा लेखक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सातारा येथील नगर वाचनालयामधे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी अत्यंत थाटामाटात पार पडला. आपल्या आईसोबत, माहेरच्यांच्या सान्निध्यात हा पुरस्कार स्वीकारणे.. आयुष्यतील एक अनमोल क्षण होता.. असं त्या म्हणाल्या.
त्यांच्या दिशांतर ह्या गझलसंग्रहाला मिळालेला हा सहावा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.
हा पुरस्कार म्हणजे आपल्या पुढील लिखाणाची शिदोरी व आपल्या लेखणीचे बळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पुरस्काराबद्दल अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालय संस्थेचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक डॉ राजेंद्र माने संस्थापक माजी नगरसेवक डॉ.रविंद्र भारती कार्यवाह शशीभूषण जाधव.. आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.