पुसद येथे रविवारी रंगणार एकदिवसीय गझल संमेलन संमेलनाध्यक्षपदी श्रीकृष्ण राऊत तर उद्घाटक म्हणून शिवाजी जवरे उपस्थित राहणार

पुसद येथे रविवारी रंगणार
एकदिवसीय गझल संमेलन
संमेलनाध्यक्षपदी श्रीकृष्ण राऊत तर उद्घाटक म्हणून शिवाजी जवरे उपस्थित राहणार
यवतमाळ: एन. वाय. नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गझल मंथन साहित्य संस्था व यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीतर्फे पुसद (जि. यवतमाळ) येथे रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी विदर्भ विभागीय एकदिवसीय मराठी गझल संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गझलकार शिवाजी जवरे यांच्या हस्ते होणार आहे.
या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून गझलकार जयवंत वानखडे व गझलकार अमोल शिरसाट उपस्थित राहणार आहेत. गझलकार निलेश कवडे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. सुप्रसिद्ध गझलकार गंगाधर मुटे यांना संमेलनात जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
याच संमेलनात श्रीकृष्ण राऊत यांचे ‘गझलचे उपयोजित छंद: शास्त्र’ आणि गझलकारा आरती पद्मावार यांचे ”इच्छा घार होताना’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल गादेवार व स्मिता पांडे करतील.
यानंतर संमेलनात एकूण सहा मुशायरे रंगणार आहेत. या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद श्रीकृष्ण राऊत, अमोल शिरसाट, तेजस भातकुलकर, सुभाष मगर, सुनंदा भावसार आणि स्नेहा शेवाळकर भूषवतील तर सूत्रसंचालन मारुती मानेमोड, प्रीती वाडीभस्मे, दिपाली सुशांत, चेतन पवार, दिपाली कुलकर्णी आणि निशा डांगे करतील. या गझल संमेलनात विदर्भ, मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील गझलकार सहभागी होणार आहेत.
हे संमेलन नवीन पुसद येथे रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत स्टेट बँकेजवळील राजे उदाराम मंगल कार्यालयाच्या सभागृहात रंगणार आहे.
या गझल संमेलनाचा गझल रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, संयोजक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, संमेलन समितीचे अध्यक्ष ॲड. मुकुंदराव जाधव, समन्वयक प्रदीप तळेकर, यवतमाळ जिल्हाध्यक्षा स्नेहा शेवाळकर, शहर संयोजक निशा डांगे, यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी व विदर्भ विभागीय कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.