आपला जिल्हाताज्या घडामोडी

डॉ. दगडू माने यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड महाराष्ट्र शासनाकडून थेट नियुक्ती

डॉ दगडू माने यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड:

महाराष्ट्र शासनाकडून थेट नियुक्ती ; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्ती पत्र

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील सामाजिक कार्यकर्ते, आचार्य प्र के अत्रे उत्कृष्ठ पत्रकार व महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉ दगडू श्रीपती माने (पत्रकार) यांची महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारी पदी थेट नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही निवड केली असून शिरोळ तहसील कार्यालयामार्फत डॉ माने यांना या नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे.
डॉ दगडू माने यांनी सामाजिक, पत्रकारिता व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य केले असून महाराष्ट्र शासनाकडून त्यांना यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. शासन समाजभूषण पुरस्कार व्यक्तींना शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारी पदी थेट नियुक्ती केली जाते. या आदेशाच्या अनुषंगाने ही निवड घोषित करण्यात आली आहे
शिरोळ मंडल अधिकारी विनायक आरगे व तलाठी संभाजी घाटगे यांच्या हस्ते डॉ माने यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??