स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयामधे महिला व बालक तपासणी विशेष शिबीर संपन्न

आयुष विभागातर्फे आजी बाईचे स्वयंपाकघर हा विशेष उपक्रम साजरा
गारगोटी :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
भारत सरकारच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आज दि. 20 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे महिला व बालक तपासणी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते.
रुग्ण कल्याण समिती सदस्य आ. रवी देसाई, आ.सुनील निंबाळकर आ. संजयसिंह चिले भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील,आ. अल्केश कांदळकर माजी डेप्युटी सरपंच सागर शिंदे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्धन सर या मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाट्न झाले.मान्यवरांनी महिलांना प्रोत्साहित करणारी मनोगते व्यक्त केली.शिबिरामधे डॉ. विनायक सरजे (कान, नाक, घसा तज्ञ) डॉ. इजाज मुजावर (ऑडिओलॉजिस्ट) डॉ. अभिजीत चौधरी (भिषक)डॉ. सुप्रिया खन्ना (मानसोपचार तज्ज्ञ तज्ञ) डॉ. पिलाई मॅडम (स्त्री रोग तज्ञ)डॉ. वृषाली खोत ( दंतरोग तज्ज्ञ)डॉ. सविता शेट्टी ( होमिओपॅथी तज्ज्ञ )या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांनी या अभियाना बद्दल माहिती दिली. डॉ. मिलिंद कदम यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
आयुष विभागातर्फे आजीचे स्वयंपाकघर हा विशेष उपक्रम साजरा करण्यात आला. काळाच्या ओघाबरोबर विस्मरणात गेलेल्या तेल व साखर विरहित पोषक अन्नपदार्थांची चवीसह नव्याने ओळख करून देण्यात आली. बाजरीचा खिचडा पासून पिंपळाच्या पानाची भाजी,लाह्याचे मुटके तांदळाच्या वड्या,बांबूच्या कंदाच्या पुऱ्या.. अशा अनेक पदार्थांचा त्यात समावेश होता. डॉ. स्नेहल कुलकर्णी, डॉ. सविता शेट्टी, मीना जंगम यांनी हा अभिनव उपक्रम राबवला ज्याला महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
या शिबिराचा जवळजवळ ५०० जणांनी लाभ घेतला.
गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचा नर्सिंग व इतर सर्व स्टाफ, RBSK वैद्यकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी खराडे, डॉ. सारिका कुंभार, डॉ. महेश गोनुगडे, डॉ. हजारे,इनचार्ज स्मिता राऊत ,पूनम कोरे, मधुबाला साळोखे, दिपाली हंडे या सर्वांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??