मारुती सुझुकी विक्टोरिसची भारतात एंट्री, किंमत १०.४९ लाख रुपयांपासून

मारुती सुझुकी विक्टोरिसची भारतात एंट्री, किंमत १०.४९ लाख रुपयांपासून
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवी एसयूव्ही “विक्टोरिस” भारतात सादर केली आहे. या गाडीची एक्स-शो-रुम किंमत १० लाख ४९ हजार ९०० रुपये इतकी ठेवण्यात आली असून विक्रीची सुरुवात २२ सप्टेंबरपासून होणार आहे.
विक्टोरिस एकूण चार पॉवरट्रेन पर्यायांसह बाजारात आली आहे – पेट्रोल, ऑटोमॅटिक, हायब्रिड आणि सीएनजी. सुरुवातीच्या पेट्रोल व्हेरिएंट्समध्ये LXi, VXi, ZXi, ZXi (O), ZXi+ आणि ZXi+ (O) अशी मॉडेल्स असून त्यांची किंमत १०.४९ लाखांपासून सुमारे १५.८१ लाखांपर्यंत आहे.
ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह विक्टोरिस VXi AT, ZXi AT, ZXi (O) AT, ZXi+ AT आणि ZXi+ (O) AT अशी मॉडेल्स उपलब्ध असून त्यांची किंमत १३.३५ लाखांपासून १७.७६ लाख रुपयांपर्यंत आहे. याशिवाय ऑलग्रिप सिलेक्ट AWD तंत्रज्ञानासह ZXi+ AT AWD आणि ZXi+ (O) AT AWD ही दोन व्हर्जन्सही उपलब्ध होणार आहेत ज्यांची किंमत अनुक्रमे १८.६३ लाख व १९.२१ लाख रुपये आहे.
हायब्रिड पर्यायात VXi e-CVT, ZXi e-CVT, ZXi (O) e-CVT, ZXi+ e-CVT आणि टॉप-एंड ZXi+ (O) e-CVT अशी मॉडेल्स असून या व्हर्जन्सची किंमत १६.३७ लाखांपासून १९.९८ लाख रुपयांपर्यंत आहे.
त्याचबरोबर पेट्रोल-सीएनजी पर्यायही दिला गेला आहे. LXi CNG, VXi CNG आणि ZXi CNG ही मॉडेल्स अनुक्रमे ११.४९ लाख, १२.७९ लाख आणि १४.५६ लाख रुपयांना उपलब्ध होतील.
डिझाइनच्या बाबतीत विक्टोरिसला आधुनिक ग्रिल, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. इंटीरियरमध्ये १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफ आणि अॅम्बियंट लाईटिंग अशी वैशिष्ट्ये आहेत. सेफ्टीसाठी सहा एअरबॅग्स, ३६० डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम तसेच लेव्हल-२ ADAS फिचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, विक्टोरिसला भारत NCAP व ग्लोबल NCAP कडून ५-स्टार रेटिंग मिळाले आहे.
मारुती सुझुकीचा दावा आहे की, विक्टोरिस हा भारतीय बाजारात मध्यम व उच्चवर्गीय ग्राहकांसाठी परवडणारा आणि आधुनिक SUV पर्याय ठरेल. २२ सप्टेंबरपासून देशभरातील अधिकृत शोरूममध्ये या गाडीची विक्री सुरू होणार आहे.


