देवी अंबाबाईची महाविद्या श्रीभुवनेश्वरी माता रूपातील सालंकृत पूजा

नवरात्र विशेष
26 सप्टेंबर,2025
देवी अंबाबाईची महाविद्या श्रीभुवनेश्वरी माता रूपातील सालंकृत पूजा
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
|| श्रीमाता ||
अश्विन शु.शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५पूजा क्रमांक ५ / महाविद्या क्र.४
||महाविद्या श्रीभुवनेश्वरी माता ||
ध्यानम – उद्यद्दिनद्युति मिंदुकिरीटां तुंगकुंचां नयनत्रययुक्ताम् |स्मेरमुखीं वरदांकुशपाशाभीतिकरां प्रभजे भुवनेशीम् ||
स्वरूप –
अरुणोदया प्रमाणे जिचा शरीर वर्ण असून, मुकुटावर जिने चंद्र धारण केला आहे. जी त्रिनेत्रयुक्त असून, प्रसन्नमुखी आहे, जिने आपल्या वरील दोन हातात, वरदहस्त व अंकुश तर खालील दोन हातात अभय व पाशयुक्त आहेत, अशा भुवनेश्वरीची उपासना करतो.
इतिहास – सृष्टि उत्पतीकाळी जेव्हा ब्रह्मदेवाने सोमाहुती द्वारा यज्ञ संपन्न केला, तेव्हा जी शक्ती षोडशीरुपात विद्यमान होती, तीच त्रिभुवनाचे रक्षण करू लागली आणि तीच ‘भुवनेश्वरी’ नावाने विख्यात झाली. तिलाच ‘राजराजेश्वरी’ देखील म्हणतात. ही चौथी महाविद्या असून, हिचा महादेव भैरव आहे, हिची भाद्रपद शु. १२ ला उत्पत्ती झाली, काली कुलातील ही देवता, पूर्वाम्नायपीठस्था आहे.
उपासना भेद: आदिशक्ती, भुवनेश्वरी, ज्येष्ठा, रौद्री, शताक्षी, स्मेरमुखी हे उपासनेचे प्रकार आणि उपासनाभेद आहेत.
फले: वाचासिद्धि, सौभाग्यवृद्धी, शत्रपराजय, विजयप्राप्ती, षट्कर्मसिद्धि आणि सर्व मनोरथ सिद्धी ही या उपासनेने मिळणारी फळे आहेत.
आधार लेखन: ही माहिती वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी, कोल्हापूर यांनी लिहिलेली आहे.


