अतिवृष्टीमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा ५ ऑक्टोबरला – पुतळा समिती बैठकीत निर्णय

अतिवृष्टीमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा ५ ऑक्टोबरला – पुतळा समिती बैठकीत निर्णय
जयसिंगपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर शहरामध्ये रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होणार होता, त्याचे संपूर्ण नियोजनही झाले आहे, परंतु दोन दिवसांपासून शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस झाला असून रविवारी तालुक्यात अतिवृष्टीसह ८० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा आयोजन समितीची बैठक पार पडली बैठकीमध्ये येणाऱ्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना पावसामुळे त्रास होऊन त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुतळा आगमन सोहळा व मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.05 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी चार वाजता घेण्याचे निश्चित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा आणि यानिमित्ताने होणारी भव्य आणि दिव्य मिरवणूक प्रत्येकांनी नजरेत साठविण्यासारखी असणार आहे. त्यामुळे या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांना लाभावे या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे कमिटी समन्वयक यांनी सांगितले. या क्रायक्रमानिमित्त मागील आठ दिवसात तालुक्याचे प्रत्येक गावातून निघालेल्या भीमज्योत परिक्रमाचे भीमसैनिक आंबेडकर प्रेमी जनता व तालुक्यातील जनतेने गावोगावी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. दि.05 ॲाक्टोंबर 2025 रोजी होणाऱ्या या भव्य आणि दिव्य मिरवणूकीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ही बैठकीत करण्यात आले. या बैठकीस आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, यांच्यासह पुतळा समितीचे समन्वयक सुरेश कांबळे, आनंदा शिंगे, बाळासाहेब कांबळे, रमेश शिंदे, जयपाल कांबळे, माजी नगराध्यक्ष मिलींद शिंदे, महेंद्र सावंत, सागर बिरनगे, उमेश आवळे, जॅान सकटे, अनुप मधाळे, रंगराव कांबळे, देवेंद्र कांबळे, विकास कांबळे, उत्तम जगताप, संजय शिंदे, सुशांत भोसले, सेनापती भोसले, राजेंद्र झेले यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.


