आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे “महाविद्या श्रीमहाकाली माता” स्वरूपात अलंकार महापुजा दर्शन

नवरात्र विशेष:

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे “महाविद्या श्रीमहाकाली माता” स्वरूपात अलंकार महापुजा दर्शन.

 

कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

|| श्रीमाता ||

अश्विन शु. सप्तमी, सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ पूजा क्रमांक ७ / महाविद्या क्र.९

|| महाविद्या श्रीमहाकाली माता ||

ध्यान मंत्र :

करालवदनां घोरां मुक्तकेशीं चतुर्भुजाम् |

कालिकां दक्षिणां दिव्यां मुंडमालाविभूषिताम् ||

सद्यः धिन्नशिरःखड्ग वामाधोध्वोर्धं करांबुजाम् ।

अभयं वरदं चैव दक्षिणोध्वाधः पाणिकाम् ||

स्वरूपवर्णन :हिचे मुख अत्यंत भीतीदायक असून, मुक्तकेशी, मुंडमाला धारण केलेली, चारहात असलेली डाव्या खालील हातात नुकतेच कापलेले नरमुंड व वरील हातात खड्ग उजव्या वरील हातात अभयदायी आशीर्वाद व खालील हात अभयमुद्रादर्शक आहे.

इतिहास : सृष्टिचा लय करणे हे हिचे कार्य असून, सृष्टीच्या आरंभी हीच सर्वत्र व्याप्त होती. ब्रम्हदेवांनी मधु-कैटभांच्या वधासाठी श्री विष्णूंना जागृत करणेकामी, योगनिद्रा महाकालीचीच प्रार्थना केली. तेव्हा विष्णूंच्या चेहरा, बाहू व हृदयातून हिचे तेज व स्वरूप प्रगटले. हीच महाकाली होय, अश्विन शुद्ध अष्टमीस हिची उत्पती मानली जाते. ही पहिली महाविद्या असून, हिचा महाकाल भैरव आहे, अश्विन कृष्ण अष्टमीला हिची उत्पती झाली. ही कालीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे.

फल : हिच्या उपासनेने बाधा निवारण, सुख सौभाग्य व ब्रम्हज्ञान प्राप्ती, पराक्रमप्राप्ती सर्वत्र विजयप्राप्ती, सकल वैभवप्राप्ती होते.

उपासना भेद – दक्षिणकाली, स्मशानकाली, संततिप्रदाकाली, स्पर्शमणिकाली, चिंतामणिकाली, भद्रकाली, कामकलाकाली, हंसकाली इ. हिचे प्रकार व उपसनाभेद आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??