अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर दर्शन यात्रा आता एका मुक्कामात:

अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर दर्शन यात्रा आता एका मुक्कामात:
कोल्हापूरातून दिवाळी पर्यटन करणाऱ्यांसाठी स्वस्तात मस्त रेल्वे प्रवास सुविधा
कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर ते कलबुर्गी मार्गावर सकाळच्या सत्रात रेल्वे सुरू झाल्याने अक्कलकोटसह विविध धर्मस्थळांची दर्शन यात्रा एकाच मुक्कामात करणे शक्य झाले आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.कोल्हापूर ते कलबुर्गी मार्गावर नुकतीच सकाळच्या सत्रात धावणारी रेल्वे सुरू झाली आहे. कोल्हापुरातून सकाळी ६:१० वाजता सुटून मिरजेत ७:३० वाजता येते. पंढरपूरला दुपारी १२:१५ वाजता, सोलापुरात २:३० वाजता, अक्कलकोटला ३ वाजता पोहोचते. गाणगापुरात पावणेचार वाजता जाते. कलबुर्गीमध्ये दुपारी सव्वा चार वाजता जाते.परतीच्या प्रवासात हीच गाडी कलबुर्गीतून सायंकाळी ६:१० वाजता सुटून गाणगापुरात साडेसहा वाजता, अक्कलकोटमध्ये ७:१० वाजता, सोलापुरात रात्री साडेआठ वाजता, पंढरपुरात रात्री सव्वा अकरा वाजता, मिरजेत पहाटे तीन वाजता व कोल्हापुरात पहाटे पावणेसहा वाजता पोहोचते.या गाडीने मिरजेतून थेट अक्कलकोट किंवा गाणगापूरला गेल्यानंतर देवदर्शन करून मुक्काम करता येतो. दोन्ही ठिकाणी भक्त निवासांची सोय आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कलबुर्गी-कोल्हापूर ही एक्स्प्रेस गाणगापुरात सकाळी सात वाजता, तर अक्कलकोटमध्ये सकाळी पावणेआठ वाजता येते. या गाडीने पंढरपूरला परतीच्या प्रवासाला येता येते. पंढरपुरात देवदर्शन करून दुपारी दोन वाजताच्या परळी-मिरज पॅसेंजरने मिरजेला परतता येते.


