आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

५८व्या युवा महोत्सवात देवगड महाविद्यालयाचे देदीप्यमान यश

५८व्या युवा महोत्सवात देवगड महाविद्यालयाचे देदीप्यमान यश

देवगड: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या ५८व्या युवा महोत्सवामध्ये श्री स ह केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीमध्ये उत्तुंग कामगिरी करत पाच कला प्रकारामध्ये भरघोस यश संपादन केले आणि शिक्षण विकास मंडळ देवगड संचलित श्री. स. ह. केळकर देवगड महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. पाच कला प्रकारापैकी भारतीय लोकनृत्य आणि मराठी स्कीट यामध्ये सुवर्ण पदक, कथाकथन – रौप्य पदक, स्पॉट फोटोग्राफी- कांस्य पदक आणि हिंदी स्कीट – उत्तेजनार्थ. 

सहभागी विद्यार्थी – १. भारतीय लोकनृत्य (सुवर्ण पदक) – साहिल दीपक जाधव, साहिल दिलीप जाधव, शिवमणी पाळेकर, विनीत चव्हाण, पार्थ नाईकधुरे, अभिषेक शिंदे, योगीराज नार्वेकर, प्रफुल्ल हजारे, तनिष नाईक आणि साइनील धूुरे

२. मराठी स्किट (सुवर्ण पदक) – साहिल दीपक जाधव, साहिल दिलीप जाधव, शिवमणी पाळेकर, विनीत चव्हाण, योगीराज नार्वेकर, ऋत्वीज गावकर, अभिषेक शिंदे, पार्थ नाईकधुरे आणि हर्षद मेस्त्री 

३. कथाकथन मराठी (रौप्य पदक) – नुपूर लळीत 

४. स्पॉट फोटोग्राफी (कांस्य पदक) – तनिष नाईक 

५. हिंदी स्कीट (उत्तेजनार्थ पदक) – ईश्वरी शंकरदास, सानिका कावले, राधिका माने, श्रद्धा म्हापसेकर, श्रेया नाईकधूुरे, स्नेहल वाघट, अभिषेक शिंदे आणि हर्षद मेस्त्री सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आणि सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल शिक्षण विकास मंडळ देवगड चे पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य आणि प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे आणि सांस्कृतिक विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??