आपला जिल्हाक्राईम न्युजताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत संजीवन ठरला विजेता.

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत संजीवन संघ ठरला विजेता..

विभागीय स्पर्धेसाठी  संघाची निवड.

पन्हाळा-एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
मिणचे ता.हातकणंगले येथे १९ व २० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत संजीवन पब्लिक स्कूलच्या संघांने अंतिम सामन्यात कागल तालुक्याच्या संघाचा पराभव करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संजीवनच्या संघाने पहिल्या सामन्यात गडहिंग्लज तालुक्याचा एकतर्फी पराभव करत विजयी सलामी देत दबदबा निर्माण केला.त्यानंतर आदर्श विद्यानिकेतन या हातकणंगले तालुक्याचा प्रतिनिधित्व करणाऱ्या व विजेते पदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या संघासोबत झालेल्या सामन्यात २५-१९,२५-२१ अशा २-० सेटच्या गुणफरकाने विजय मिळवत उपांत्य सामन्यात धडक दिली.उपांत्य सामन्यात करवीर तालुक्याचा एकतर्फी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.अंतिम सामन्यात संजीवनची लढत कागल तालुक्याबरोबर झाली या सामन्यात संजीवनच्या संघाने पहिला सेट २५-१६ अशा गुणफरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली.दुसऱ्या सेट मात्र अतिशय अटीतटीचा झाला.मात्र संजीवनने हा सेट २५-२३ ने जिंकत 2-00 अशा सेटनी सामन्यासह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.संजीवनकडून श्लोक कवितके,विक्रम माने यांनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.
या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या संघाला क्रीडाशिक्षक प्रकाश जाधोर,प्रशिक्षक अबिद मोकाशी,कपिल खोत,नुरमहंमद नगारजी,जयंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर संजीवन चेअरमन पी.आर.भोसले,सहसचिव एन.आर.भोसले,
क्रीडा विभाग प्रमुख सौरभ भोसले,प्राचार्य बी.आर.बेलेकर यांचे प्रोत्साहन लाभले.

संजीवनचा संघ पुढील प्रमाणे-श्लोक कवितके, विक्रम माने, ओम मगर, सोहम वाडकर ,आर्यन सासवडे, समर्थ ढोक, ओम साळस्कर, अर्जुन पाटील, कार्तिक कौशल्य ,प्रेम शेळके, संचित पाटील, प्रथमेश कदम.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??