आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शरद कॉलेज ऑफ फार्मसी इचलकरंजीत फार्मासिस्ट दिन उत्साहात

शरद कॉलेज ऑफ फार्मसी इचलकरंजीत फार्मासिस्ट दिन उत्साहात

 

 

जयसिंगपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

यड्राव येथील शरद कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यामार्फत जागतिक फार्मासिस्ट दिन विविध उपक्रममाने उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी इचलकरंजी बस स्टँड ते महसत्ता चौक दरम्यान भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी काढली. या रॅलीमध्ये ‘आरोग्याचा विचार करा – फार्मासिस्टचा विचार करा, एडीआर नोंदवा – जीव वाचवा, औषधांचे दुष्परिणाम’ या घोषणा देण्यात आला. यावेळी नागरिकांना फार्मासिस्टचे महत्त्व, औषधांचा योग्य वापर, रुग्ण सुरक्षा व आरोग्याबाबतची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यात आली.

यावेळी शहरातील औषध सेवा पुरवणाऱ्या औषध दुकानदारांना सन्मान चिन्ह देवून एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. तसेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हा सन्मान त्यांच्या निरंतर आरोग्यसेवेतल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात कॉलेजचे माजी विद्यार्थ्यांनीदेखील सक्रिय सहभाग घेतला. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, प्रेरणा आणि व्यावसायिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत झाली. यावेळी प्राचार्य गौरी फडके, प्राध्यापक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासाठी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल बागणे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??