के. पी.पाटील पॉलीटेक्निक मुदाळ येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबीर

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय गारगोटी व के. पी. पाटील पॉलिटेक्निक मुदाळ व ग्रामपंचायत मुदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने के. पी.पाटील पॉलीटेक्निक मुदाळ येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबीर
गारगोटी:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत नुकतेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटी व के. पी.पाटील पॉलीटेक्निक मुदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुदाळ ग्रामपंचायत सरपंच सौ राजनंदिनी वि. पाटील होत्या. उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यांचे निराकरण, निरोगी जीवनशैली पोषण व स्वच्छता यावर मुलींना सविस्तर मार्गदर्शन केले. मुलींच्या आरोग्य विषयक समस्यांना समाधानकारक उत्तरे दिली.सुमारे 300 मुलींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.प्रयोगशाळा तंत्रज्ञ विद्या निकम यांनी १२० मुलींची रक्त तपासणी केली.कार्यक्रमासाठी KPIT कॉलेजचे सर्व मान्यवर शिक्षकवृंद उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.


