अंबाई टॅन्क परिसरातील मोबाईल ग्रुप यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात

कोल्हापूर: येथील अंबाई टॅन्क परिसरातील मोबाईल ग्रुप यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.
कोल्हापूर:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
दरवर्षीप्रमाणे यावेळीही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या महाप्रसादाचा अनेक भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी आस्वाद घेतला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक,आमदार राजेश क्षीरसागर,अमल महाडिक, उद्योजक तेज घाटगे शंकर पाटील,भारतीय जनता पक्षाचे व शिवसेना शिंदे गट यांचे
पदाधिकारी महेश जाधव, सुजित चव्हाण,विजय जाधव,तसेच सुहास लटोरे, मानसिंग बोंद्रे,सुनील तेलनाडे,विलास वास्कर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते देवी मातेची महाआरती करण्यात आली व नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा प्रारंभ करण्यात आला.
मोबाईल ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात याबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले अणि भावी उपक्रमांसाठी सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले.
मोबाईल ग्रुप तर्फे. अमोल पालोजी,गणेश पाटील, सागरडंबल ,अमित पलोजी,शरद पाटील,सचिन बांदेकर, भगवान पाटील, विपुल कांदेकर, भगवान जाधव, धनंजय भूतकर, अनिरुद्ध कुलकर्णी, रोहित कांदेकर,अमित कपडेकर ,धनंजय उरुंकर, संदीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
तसेच वैभव पिसाळ,दिग्विजय पाटील, राजवर्धन पाटील, केशव रेड्डी, अक्षय पाटील, रोहित चाचे, प्रतीक भक्ते, अर्थव ढोबळे, पियूष गायकवाड, यश माळी, शुभम चौगले, अभिजित बुडके,समीर दिवेकर,चंद्रशेखर मुळे ,प्रमोद जगताप, दत्ता रणदिवे,ओंकार कुलकर्णी,ओंकार संगावकर,सुमेध घाटगे ,प्रणव गुरव,ऋषिकेश दुरुगकर,तेजस भक्ते ,अवधूत अळतेकर ,संकेत कांबळे,यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
याप्रसंगी हेमंत कांदेकर,अमोल पाटील,बादशहा शेख,महेश नलावडे व मोबाईल ग्रुपचे सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.


