जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींची बाजी

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींची बाजी
इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क: जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय, शासकीय वेटलिफ्टिंग स्पर्धा मंगळवार दि. 30 सप्टेंबर, 2025 या दिवशी वंदे मातरम मैदान येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपापल्या गटामध्ये विजय संपादन केला.58 किलो वजन गटामध्ये श्रेया अमोल जाधव इयत्ता आठवी प्रथम क्रमांक48 किलो वजन गटामध्ये समीक्षा सागर लवटे इयत्ता सहावी द्वितीय क्रमांक या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा,चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकर, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे , स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका, ए. एस काजी उपमुख्याध्यापिका सौ व्ही एस लोटके, उपप्राचार्य व्ही जी पंतोजी, पर्यवेक्षक श्री एस एस कोळी , ज्येष्ठ शिक्षक श्री डी डी कोळी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना जिमखाना प्रमुख श्री बी एस माने , वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षक उत्तम मेंगणे, क्रीडा शिक्षक के पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


