इंडियन लीग फुटबॉल स्पर्धेसाठी संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी ठरली पात्र. संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा
संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीमुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल. मालोजीराजे छत्रपती

इंडियन लीग फुटबॉल स्पर्धेसाठी संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी ठरली पात्र.
संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा.
संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीमुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल. मालोजीराजे छत्रपती.
पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या युथ लीग स्पर्धेमध्ये स्थान मिळाल्याने हा क्षण कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. या स्पोर्ट्स अकॅडमीमुळे कोल्हापूरचे नाव निश्चितपणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल असा विश्वास के एस ए चे अध्यक्ष व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन युथ लीग मध्ये संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीला स्थान मिळाल्याबद्दल अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्याच्या समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला महिला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती, संजीवनचे चेअरमन पी. आर. भोसले, संजीवनचे क्रीडा संचालक सौरभ भोसले संस्थेचे सर्व संचालक मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले जाईल तसेच यामुळे खेळाडूंना एक चांगली संधी देखील उपलब्ध झाली आहे. संजीवनने फुटबॉल खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य या निमित्ताने केले आहे. छत्रपती घराण्याने नेहमीच कला व क्रीडा क्षेत्राला उभारी देण्याचे काम केले आहे. फुटबॉल क्षेत्रामध्ये जी काही शक्य होईल तेवढी मदत करण्याची ग्वाही यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी दिली.
छत्रपती राजाराम महाराजांपासून कोल्हापुरात फुटबॉल खेळ हा रुजवला गेला आहे तोच वारसा पुढे मालोजीराजे व मधुरिमा राजे छत्रपती यांनी चांगल्या रीतीने चालवला आहे. छत्रपती घराण्याने फुटबॉल वाढविण्यासाठी फार मोठे योगदान दिले असून ते असेच पुढे चालू राहील. तीस वर्षात संजीवनचे विविध खेळ प्रकारात एक हजाराहून अधिक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. संजीवनने शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्राला देखील महत्त्व दिले आहे त्यामुळेच आज अत्यंत महत्त्वाची व मानाची मानली जाणारी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन च्या आयलिग स्पर्धेसाठी संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी पात्र ठरली आहे. ही खरोखरच संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने फुटबॉल खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली असून याचा निश्चितपणे भविष्यात खेळाडूंना फायदा होईल असे मत चेअरमन पी. आर. भोसले यांनी व्यक्त केले.
प्रथम दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांचे स्वागत व सत्कार पी.आर. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असणारे कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडू प्रशिक्षक व विविध पदाधिकारी यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. मालोजीराजे छत्रपती व मधुरिमा राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी चा लोगो, या संघाची जर्सीचे अनावरण करण्यात आले. यानंतर संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीची तयार करण्यात आलेली चित्रफीत देखील मान्यवरांच्या समोर प्रदर्शित करण्यात आली.
” ज्याप्रमाणे आयपीएल च्या स्पर्धा खेळवल्या जातात त्याचप्रमाणे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने देखील फुटबॉलचे सामने खेळवले जातात. यामध्ये देशभरातील ज्या संघांना स्थान या स्पर्धेमध्ये मिळाले आहेत असे संघ या स्पर्धा खेळतात. यामध्ये स्थान मिळवणे हे खरोखरच खूप अभिमानाची बाब असते. कोल्हापूर,सांगली,सातारा या तीन जिल्ह्यात प्रथमच हा मान संजीवन ला मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापूर च्या फुटबॉल क्षेत्राला निश्चितच एक नवी दिशा मिळेल व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.”


