आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

राष्ट्रीय खेळाडू सौरभ इंगळे यांना कै.दिनकररावजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार जाहीर

१ फेब्रुवारीच्या साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान होणार.                                                       

राष्ट्रीय खेळाडू सौरभ इंगळे यांना कै.दिनकररावजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार जाहीर – १ फेब्रुवारीच्या साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान होणार.                               

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने माजी आमदार, दलितमित्र भाई कै. दिनकररावजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार शिरोळचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सौरभ बजरंग इंगळे यांना जाहीर झाला असून रविवारी १ फेब्रुवारी रोजी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार व उपाध्यक्ष डॉ दगडू माने यांनी दिली.

 रविवार, दिनांक १फेब्रुवारी रोजी माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक दिवसीय साहित्य संमेलन होत आहे. यात ख्यातनाम साहित्यिक विठ्ठल वाघ , भीमराव धुळूबुळू, प्रसिद्ध धन्वंतरी अनिल मडके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कबड्डी खेळाडू इंगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व स्पोर्ट्स कीट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सौरभ बजरंग इंगळे हे बाल शिवाजी मंडळ शिरोळचे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांचे शिक्षण बी.एस.सी. पदवी झाले आहे. त्यांची अलिबाग येथे झालेल्या २९ व्या किशोर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर संघात निवड झाली होती, या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला विजेतेपद मिळवून दिले. पुढे अहिल्यानगर येथे झालेल्या ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर संघात निवड झाली होती. त्यानंतर ठाणे येथे ७२ व्या वरिष्ठ गट पुरुष राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर संघात निवड होवून झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल २२ वर्षांनी विजेतेपद मिळवून देण्यात खेळाडू सौरभ इंगळे याचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचे नाव या पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??