संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या विभागीय फेरीसाठी पात्र.

संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ आयलीग फुटबॉल स्पर्धेच्या विभागीय फेरीसाठी पात्र.
पन्हाळा: एन. वाय. नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
भारतामधील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या युथ आयलीग फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरची संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून मोठमोठे संघ सहभागी होतात. यामध्ये पात्रता स्पर्धा, विभागीय फेरी व अंतिम सामनेअशा तीन फेरीत ही स्पर्धा खेळवली जाते.
या स्पर्धेच्या पात्रता फेरीत महाराष्ट्र व गुजरात येथून संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी कोल्हापूर बरोबरच सिटी एफ सी पुणे, युके एम कोथरूड पुणे,महाराष्ट्र ऑरेंज एफसी मुंबई, आर एफ सी गुजरात ,नाशिक ज्युनिअर फुटबॉल क्लब नाशिक, एस एस सी बी एफ सी स्कोर स्कूल मुंबई,इंडिया रश सॉकर मुंबई,सोमय्या स्पोर्ट्स मुंबई, किंगक्रे फुटबॉल अकॅडमी मुंबई अशा दिग्गज संघांनी सहभाग घेतला होता .
या सर्वच सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करत पात्रता फेरीत संजीवन संघाने स्पोर्टीको पुणे संघाचा 15 गोलने पराभव केला तसेच सिटीएफसी पुणे संघाचा 19 गोलने ,युके एम कोथरूड एफसी पुणे संघाचा 6 गोलने तर महाराष्ट्र ऑरेंज एफसी संघाचा 6 गोलने पराभव केला व हा संघ विभागीय फेरीसाठी पात्र ठरला.
पुढील स्पर्धेसाठी साठी आठ संघांमध्ये होम अवे पद्धतीने सामने ठेवले जातील यात पुढील वाटचालीसाठी रिलायन्स युथ डेव्हलपमेंट तसेच मुंबई सिटी अशा मोठमोठय़ा संघांशी संजीवन संघाचा मुकाबला होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या मुलांना देशातील नामवंत संघाबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे.हे सामने 26 जानेवारी पासून कोल्हापूर मुंबई पुणे व गुजरात येथे होणार आहेत.
संजीवन संघातून शुभंकर भाटे कर्णधार ,श्रेयस कोरवी,वीर पाटील, सार्थक हवलदार, ओम कुराडे,पियुष गायकवाड,अनुज कातवरे ,वेदांत माळी पार्थ खवरे ,प्रीत भोसले, नील जोशी ,सोहम माळी, सूर्यांश पाटील,केदार भोसले ,ओजस नाईक,बीकास सिंग ,अविनाश मैत्री, थोयसिंग हे खेळाडू सहभागी होणार आहेत.
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक अमित साळोखे, क्रीडा शिक्षक सागर पाटील,जयंत कुलकर्णी,नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून क्रीडा संचालक सौरभ भोसले,संस्थापक अध्यक्ष पी.आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे प्रोत्साहन लाभले आहे. या संघाला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



