पन्हाळा येथे गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना या संस्थेच्या वतीने एकदिवसीय गझल संमेलनाचे आयोजन: गझलयात्री ६ या प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे होणार प्रकाशन.

पन्हाळा येथे गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना या संस्थेच्या वतीने एकदिवसीय गझल संमेलनाचे आयोजन: गझलयात्री ६ या प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे होणार प्रकाशन.
कोल्हापूर:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 25 जानेवारी, 2026 रोजी एक दिवसीय गझल संमेलनाचे आयोजन सोमवारपेठ, पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद पुणे येथील सुप्रसिद्ध गझलकार श्री. प्रफुल्ल कुलकर्णी हे भूषविणार असून
कार्यक्रमाचे उद्घाटन गझलकार डॉ. मंदार खरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून मिरज येथील ख्यातनाम गझलकार भीमराव धुळूबुळू व प्रदीप तळेकर उपस्थित राहणार आहेत. संजीवनचे सहसचिव प्रा.एन. आर. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी या असतील.
पुणे विभागातील गझलकरांच्या गझलयात्री 6 या प्रातिनिधिक गझल संग्रहाचे प्रकाशनही या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या गझल संमेलनासाठी पुणे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यातील सर्व गझलकार उपस्थित राहणार असून गझलमंथन या साहित्य संस्थेच्या पुणे व कोल्हापूर कार्यकारिणी यांच्या वतीने या गझलसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या एकदिवसीय गझल संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत गझलकार व गझलकारा यांच्या गझल मुशायऱ्यांची मेजवानी गझल रसिकांना मिळणार असून सर्वांनी या गझल मुशायऱ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, सचिव जयवंत वानखेडे, उपाध्यक्ष देवकुमार सहसचिव ऊमा पाटील , प्रसिद्धी प्रमुख भरत जाधव आयोजन समितीचे अॅड. मुकुंदराव जाधव तसेच पुणे विभाग व कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी वैशाली माळी, प्रदीप तळेकर,मंदार खरे,संजय खोत सचिन इनामदार व धनंजय पाटील यांनी केले आहे.



