आपला जिल्हाताज्या घडामोडी

2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

कोल्हापूर/एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार, 2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उप सचिव हेमंत महाजन यांनी अधिसूचनेव्दारे दिली आहे.                         

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव (कोल्हापूर) या नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इ. ना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असेही या अधिसुचनेत नमुद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??