रॅडियंट अॅकाडमीची श्रुतिका शिवाजी लाड हिची इस्रो दौऱ्यासाठी निवड.
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
रॅडियंट अॅकाडमी कोदवडे ता. राधानगरीची विद्यार्थीनी कु.श्रुतिका शिवाजी लाड हिची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली असून तिने यासाठी अत्यंत कठीण मानल्या जाणार्या नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत यश मिळवले आहे.
या दौऱ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून फक्त १९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती यामध्ये श्रुतिका हिने कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला व ती या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र ठरली.
यासाठी तिला रॅडियंट अॅकाडमीचे संस्थापक आर. जी. पाटील, सचिव पत्रकार राजू पाटील यांचे तसेच तिच्या पालकांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील यशासाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??