आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

शिरोळ पालिका निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे अर्ज वैध दोन दुबार अर्ज अवैध, पृथ्वीराजसिंह यादव, विजय आरगे यांच्या अर्जावर हरकती. 

शिरोळ पालिका निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे अर्ज वैध दोन दुबार अर्ज अवैध, पृथ्वीराजसिंह यादव, विजय आरगे यांच्या अर्जावर हरकती. 

शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदांचे ७ उमेदवार आणि नगरसेवक पदाचे १०९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये दोन दुबार अर्ज अवैध ठरले आहेत. शिव-शाहू विकास आघाडीचे प्रमुख युवानेते पृथ्वीराजसिंह यादव आणि माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे यांच्या अर्जावर घेतलेली हरकत फेटाळून लावण्यात आली.

येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात शिरोळ पालिकेच्या निवडणुकीकरिता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. प्रथमता तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांनी छाननीसाठी उपस्थित असणाऱ्या उमेदवार व कायदेतज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांना छाननी प्रक्रियेची माहिती दिली. छाननी प्रक्रियेत उमेदवारांनी दाखल केलेले जात प्रमाणपत्र, शासकीय कर, स्वयं घोषणापत्र, अपत्य प्रतिज्ञापत्र यासह विविध कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

छाननी प्रक्रियेत प्रथमता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ श्वेता काळे, सौ सारिका माने, सौ योगिता कांबळे, सौ संगीता माने, सौ शिवानी कांबळे, सौ प्रियंका काळे, सौ करुणा कांबळे, यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली. यामध्ये शिव-शाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ योगिता सतीश कांबळे यांच्या पहिल्या अर्जामध्ये जात प्रमाणपत्राची मूळ प्रत नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैद्य ठरविण्यात आला. तर दुसऱ्या उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्राची मूळ प्रत आणि जात पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावाचे टोकन व सर्व कागदपत्राची पूर्तता असल्याने तो अर्ज वैद्य ठरविण्यात आला. 

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज छाननीनंतर प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली.

प्रभाग क्रमांक एकमध्ये दाखल असलेल्या नागरिकांचा मागास प्र. वर्गातील सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले. तथापि या प्रवर्गातील उमेदवार आणि शिव-शाहू आघाडीचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज वैध असल्याचे सांगितले. प्रभाग क्रमांक एकचे सर्व उमेदवारी अर्ज वैध असल्याचे घोषित करण्यात आले. 

यानंतर प्रभाग क्रमांक दोन व तीनमधील अर्जाची छाननी प्रक्रिया पार करून सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. प्रभाग क्रमांक चारमधील अनुसूचित जमाती पुरुष या गटातील उमेदवारी अर्जाची छाननी प्रथमत: करण्यात आली सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले होते. तथापि माजी ग्रामपंचायत सदस्य व शिव-शाहू आघाडीचे उमेदवार विजय आरगे यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. सदरची हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. या प्रभागातील सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यानंतर प्रभाग क्रमांक पाच व सहामधील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करून सर्व अर्ज वैद्य ठरले. प्रभाग क्रमांक सातमध्ये दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये राजश्री शाहू आघाडी कडून सौ शुभांगी निळकंठ फल्ले आणि सौ भारती गुंडाप्पा बन्ने या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत राजश्री शाहू आघाडीकडून कोणत्या उमेदवाराचा एबी फॉर्म ग्राह्य धरावा या संदर्भात पत्र निवडणूक विभागकडे देण्यात आले नाही. त्यामुळे नियमानुसार पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सौ शुभांगी फल्ले यांचा उमेदवारी अर्ज आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात आला. त्यामुळे सौ भारती बन्ने यांच्या अर्जासोबत एबी फॉर्मसोबत पाच सूचकांच्या स्वाक्षऱ्या असल्यामुळे तो अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरविण्यात आला. तर बन्ने यांच्या दोन्ही अर्जावर सूचक तेच असल्यामुळे दुसरा अर्ज अवैध ठरवण्यात आला. यामुळे या प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत‌.

यानंतर प्रभाग क्रमांक आठ,नऊ आणि दहामधील दाखल झालेल्या सर्व उमेदवारांच्या अर्जासोबत असलेल्या कागदपत्रांची‌ तपासणी करून सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले.

 छाननी प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त राहुल मर्डेकर, निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील, निवडणूक नायब तहसीलदार विनायक कौलवकर, पालिका प्रशासन अधिकारी राकेश चौगुले यांच्यासह महसूल विभाग आणि शिरोळ पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??