आपला जिल्हाताज्या घडामोडी

समतानगरमधील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू :उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

समतानगरमधील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू :उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरोळकर नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करणे आणि शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणे या दोन कामांना अग्रक्रम दिला जाणार असून समता नगर मधील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू अशी ग्वाही शिरोळचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिली. समता नगर जनहित मंडळाच्या वतीने सोमवारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व प्रभागातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी यादव बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सिकंदर बागकसार हे होते.                                                              समता नगर जनहित मंडळाचे अध्यक्ष नियाज मोमीन यांनी सर्वांचे स्वागत केले. ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार यांनी प्रास्ताविकात समतानगर मधील समस्यांचा आढावा घेतला. सौ. मालती शिंदे यांचे हस्ते नगराध्यक्षा सौ .योगिता कांबळे यांचा तर अध्यक्ष नियाज मोमीन यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रभागाचे नगरसेवक अमरसिंह शिंदे व सौ.सविता पुजारी यांचा सत्कार समीर मतापे व सौ. छाया कदम यांचे हस्ते करण्यात आला.   

 याप्रसंगी भिवंडी येथे झालेल्या राज्यस्तरीय उर्दू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कुमारी इसरत अझरुद्दीन मुल्ला हिचा सत्कार नगराध्यक्षा योगिता कांबळे यांचे हस्ते संपन्न झाला.

  कार्यक्रमास भाऊसाहेब कदम गुरुजी ,माणिक विटेकरी समसुद्दीन मुजावर सर ,मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर सकट ,जहांगीर सुतार ,नगरसेवक अमरसिंह शिंदे आणि पृथ्वीराजसिंह यादव यांनी मनोगत व्यक्त केले .आभार जालंधर वराळे यांनी मानले. याप्रसंगी विठ्ठल पाटील ,आशुतोष माळी यांच्यासह समता नगर परिसरातील स्त्री-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??