नेणिवेचा डोह’ पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

समग्र विश्वशांतीला समर्पित करणारे ‘नेणिवेचा डोह’ पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
सोनाली जगताप यांच्या “शब्दोत्सव” या कवितासंग्रहाचे प्रकाशन
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
“साहित्य यज्ञ हेच आमचे ध्येय” या ब्रीदवाक्याने प्रेरित शुभंकरोति साहित्य परिवार आणि नॅशनल लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेणिवेचा डोह’ हे पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडलेल्या या साहित्य सोहळ्याला राज्यभरातील साहित्यिक, कवी, गझलकार आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संमेलनाध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे, उद्घाटक म्हणून डॉ. मीनाक्षी पाटील, प्रमुख पाहुणे मा. राजीव श्रीखंडे, स्वागताध्यक्ष सोनालीताई जगताप, कार्याध्यक्ष प्रमोद महाडिक, तसेच शुभंकरोतीच्या अध्यक्षा प्रा. सुमतीताई पवार आणि मुख्य प्रशासिका मा. डॉ. मायाताई यावलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाची मंगल सुरुवात करण्यात आली.
सुरुची कोटकर यांच्या सुमधुर गणेशस्तवनाने वातावरण भक्तिमय झाले, तर मा. गुलराज सिंग यांनी सादर केलेल्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी फिल्मफेअर पुरस्कार विजेते तसेच ए. आर. रहमान यांचे सहकलाकार यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
महाकवी सुधाकर गायधनी यांच्या सुप्रसिद्ध लेखाचे अभिवाचन सोनालीताई सुहास जगताप आणि डॉ. मनोज वराडे यांनी प्रभावी शैलीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. मंजुषा सावरकर यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन स्वाती पोळ यांनी केले. प्रास्ताविक मा. प्रा. सुमतीताई पवार यांनी केले.
यावेळी मा. सोनालीताई जगताप लिखित ‘शब्दोत्सव’ आणि भावना काळे लिखित ‘सागरी किनारा’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संमेलनात विविध साहित्य पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. सरोज बारोट यांना “पुस्तक रत्न पुरस्कार”, हेमंतदादा कुलकर्णी यांना “अभिवाचन पुरस्कार”, मा. नीलंबरीताई गानू यांना “शुभंकरोति साहित्य गौरव पुरस्कार”, तर अनिताताई गुजर यांना “सकाळ सदर लेखन पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
तसेच डॉ. प्रशांत दांडेकर, आप्पा ठाकूर, घनश्याम परकाळे, विलास समेळ, बाळासाहेब तोरस्कर आणि डॉ. अजित मगदूम यांना “शुभंकरोति गुणगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
हे संमेलन विश्वशांतीसाठी समर्पित असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सदानंद मोरे यांनी “जाणीवेकडून नेणिवेकडे आणि नेणिवेच्या अथांगातून पुन्हा जाणीवेकडे जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन केले. तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी “भारतामध्ये असे वैशिष्ट्यपूर्ण साहित्य संमेलन मी यापूर्वी कधी पाहिले नाही,” असे गौरवोद्गार काढले. राजीव श्रीखंडे यांनी जागतिक साहित्यिकांच्या लेखनातून ‘नेणिवेचा डोह’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले.
दुसऱ्या सत्रात मा. रेश्मा कारखानीस, भारती डिग्गीकर, मा. जयश्री चौधरी, ऋचा पारेख, सुलक्षा देशपांडे आणि शिल्पा चऱ्हाटे यांनी प्रभावी अभिवाचन सादर केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. मंजुषा सावरकर यांनी भूषविले.
यानंतर रंगलेल्या “गझलरंग” या बहारदार सत्रात रविंद्र यशवंतराव देशमुख, प्रवीण बोपुलकर, मा. सदानंद बेंद्रे, रवींद्र सोनवणे, कल्पना गावरे, मा. राधिका भांडारकर, विजय उत्तेकर, सीमा नवले आणि नंदू सावंत यांनी आपल्या भावस्पर्शी गझलांनी उपस्थितांची दाद मिळविली. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. प्रतिभाताई सराफ यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन किरणदादा वेताळ यांनी केले.
निमंत्रितांच्या काव्यसंमेलनात डॉ. सुमन नवलकर, गजानन उफाडे, डॉ. पल्लवी परुळेकर बनसोडे, हेमांगी नेरकर, डॉ. मधुमंजिरी गटणे, एम. के. गोंधळी आणि श्रीनिवास नार्वेकर यांनी आपल्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या सत्राचे अध्यक्षस्थान मा. काव्यदूत विसुभाऊ बापट यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन मा. सुरुची संदीप कोटकर यांनी केले.
संमेलनात शुभंकरोति साहित्य परिवाराच्या संस्थापिका आणि संयोजिका सौ सोनाली सुहास जगताप यांच्या “शब्दोत्सव” या कवितासंग्रहाचे प्रकाशन थाटात पार पडले.या प्रकाशनाच्या वेळेस प्रा.डॉ. सदानंद मोरे,(संमेलनाध्यक्ष), डॉ. मीनाक्षी पाटील,(उद्घाटक), मा. राजीव श्रीखंडे (प्रमुख पाहुणे), डॉ. मंजूषा सावरकर,(अभिवाचनाच्या अध्यक्षा) प्रा. सुमती पवार, मा. प्रमोद महाडिक, मा. विद्याधर झरापकर आदी मान्यवरांच्या हस्ते “शब्दोत्सव ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.विशेष म्हणजे सदर पुस्तकाला ‘नेणिवेचा डोह ‘कार महाकवी डॉ सुधाकर गायधनी यांनी अभिप्राय दिला असून डॉ. मीनाक्षी पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित साहित्यिक, गझलकार, कवी-कवयित्री आणि रसिकांचा सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शन मा. सौ. अंकिताताई गायकवाड यांनी केले. “वंदे मातरम्” या गीताने संमेलनाची सांगता झाली.



