क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

संजीवनच्याच्या संगणक विभागातील २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटव्दारे निवड

तीन विद्यार्थ्यांना ८ लाखाचे पॅकेज

संजीवनच्याच्या संगणक विभागातील २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटव्दारे निवड

तीन विद्यार्थ्यांना ८ लाखाचे पॅकेज

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स मधील कॉम्पुटर विभागाच्या २५ विद्यार्थांची विविध कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटव्दारे निवड झाली. यातील आकांशा चव्हाण, अमेय जाधव आणि ओंकार पाटील या ३ विद्यार्थ्यांची आय व्हॅलू, बेंगलोर येथे वार्षिक आठ लाख पॅकेज याप्रमाणे निवड झाली आहे. राहिलेल्या २२ विद्यार्थ्यांची पुणे येथील विप्रो, बजाज ऑटो, ब्रिकफ़ोलिओ सोलूशन्स प्रा. ली., क्रिफ सोलूशन्स प्रा. ली., कॉटंम बर्ग प्रा. ली., टेरियम टेक्नोलॉजी प्रा. ली. आणि प्राईस वॉटर हाऊस या तसेच मुंबई येथील के टेल्व्ह प्रा. ली. या कंपनीमध्ये निवड झाली आहे.

संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या अत्याधुनिक शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त प्रात्यक्षिक ज्ञानाचा फायदा होत असलेने त्यांना नोकरी मिळणेस सुलभ होत असल्याचे मत यावेळी चेअरमन डॉ. पी. आर. भोसले यांनी व्यक्त केले. यावेळी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे सहसचिव एन. आर. भोसले आणि प्राचार्य डॉ. संजीव जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विभागप्रमुख प्रा. राहुल नेजकर, प्रा. सम्राट बाबर, प्रा. नुरेन सय्यद यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाला शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे, डॉ. गजानन कोळी, प्रा. सचिन पिसाळ, रजिस्ट्रार दीपक पाटील, मुख्य लेखापाल कृष्णात शिंदे उपस्थित होते. या कॅम्पस प्लेसमेंटसाठी टीपीओ डॉ. अजय मस्के यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??