ताज्या घडामोडी

महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार! राजेंद्र नगरमध्ये ड्रेनेज तुंबल्याने नागरिक त्रस्त

आरोग्याचा प्रश्न गंभीर. नागरिकांना नाहक मनस्ताप.

महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार! राजेंद्र नगरमध्ये ड्रेनेज तुंबल्याने नागरिक त्रस्त, आरोग्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर दरम्यान अवघ्या सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. मात्र, महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि ढिसाळ कारभारामुळे हा रस्ता आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक गटारींची सोय न केल्याने आणि ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत असल्याने येथील रहिवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या चार दिवसांपासून राजेंद्र नगर सोसायटी हॉलच्या समोर ड्रेनेज लाईन पूर्णपणे चोकअप झाली आहे. त्यामुळे मैलामिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी थेट मुख्य रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे. या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी वारंवार संपर्क साधूनही, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या मुख्य रस्त्यावरून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, पादचारी यांच्यासह वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच उच्च न्यायालयाच्या (मुंबई हायकोर्ट) न्यायमूर्ती व अधिकाऱ्यांच्या गाड्यांचीही येथून नियमित ये-जा असते. रस्त्यावरील या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

“महापालिका प्रशासनाने वेळेच पाऊल उचलून ही ड्रेनेज लाईन तात्काळ दुरुस्त करावी, हीच सर्व नागरिकांची मागणी आहे. रस्त्यावर घाणीमुळे एखादा अनुचित प्रकार किंवा अपघात घडल्यास त्याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील.असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??