आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

जोरदार पावसाने जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठा

जोरदार पावसाने जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.15 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी,खडक कोगे व राशिवडे, तुळशी नदीवरील- कसबा बीड व आरे, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली, कांटे व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, सांगरुळ, मांडुकली, वारणा नदीवरील- कोडोली व मांगलेसावर्डे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सिध्दनेर्ली, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापुर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, करडवाडी व शेणगाव, हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव व घटप्रभा नदीवरील- कानडे- सावर्डे असे एकूण 44 बंधारे पाण्याखाली आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 3.15 टीएमसी, तुळशी 1.34 टीएमसी, वारणा 7.71 टीएमसी, दूधगंगा 3.13 टीएमसी, कासारी 1.05 टीएमसी, कडवी 1.01 टीएमसी, कुंभी 1.11 टीएमसी, पाटगाव 1.44 टीएमसी, चिकोत्रा 0.53 टीएमसी, चित्री 0.63 टीएमसी, जंगमहट्टी 0.49 टीएमसी, घटप्रभा 1.55 टीएमसी, जांबरे 0.57 टीएमसी, आंबेआहोळ 0.69 टीएमसी, सर्फनाला 0.39 टीएमसी, धामणी 1.05 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.11 फूट, सुर्वे 31 फूट, रुई 60.6 फूट, इचलकरंजी 56.8 फूट, तेरवाड 50.9 फूट, शिरोळ 40.3 फूट, नृसिंहवाडी 36 फूट, राजापूर 26.3 फूट तर नजीकच्या सांगली 12.6 फूट व अंकली 15.9 फूट अशी आहे.

6 जुलै सकाळी 10 वा. पाऊस स्थितीबाबत मिळालेल्या अहवालानुसार 

जिल्ह्यात मागील 24 तासांत एकूण सरासरी 52.34 मि.मी. पर्जन्यमान नोंदविण्यात आले. तालुकानिहाय पर्जन्यमानामध्ये गगनबावडा (101.3 मि.मी.) येथे सर्वाधिक पाऊस झाला असून, त्यापाठोपाठ – हातकणंगले- 16 मिमी, शिरोळ -12.4 मिमी, पन्हाळा- 59.6 मिमी, शाहुवाडी- 87 मिमी, राधानगरी- 65.7 मिमी, गगनबावडा- 101.3 मिमी, करवीर- 54.8 मिमी, कागल- 43.3 मिमी, गडहिंग्लज- 36.6 मिमी, भुदरगड- 38.4 मिमी, आजरा- 51.3 मिमी, चंदगड- 61.7 मिमी, असा एकूण 52.34 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.

सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. मात्र अतिवृष्टीमुळे 3 राज्यमार्ग, 5 प्रमुख जिल्हा मार्ग, 8 ग्रामीण मार्ग आणि 2 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 18 रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणीपातळी 33 फूट 3 इंच, शिरोळ बंधारा येथे 40 फूट 3 इंच आणि नृसिंहवाडी येथे 36 फूट असून तिन्ही ठिकाणी नदीची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा खाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सध्या कोणताही तातडीचा पूरधोका निर्माण झालेला नाही.

जिल्ह्यातील 299 बंधाऱ्यांपैकी 48 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणामध्ये 41 टक्के पाणीसाठा असून धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. तुळशी धरणात 41 टक्के, वारणा धरणात 28 टक्के आणि दूधगंगा धरणात 13 टक्के पाणीसाठा आहे. वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी 100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

पावसामुळे झालेला घोषवारा (पडझड इ.)- करवीर- 1 लाख 60 हजार रु., कागल- 1 लाख 22 हजार रु., शाहूवाडी- निरंक, चंदगड- 1 लाख 50 हजार रु., गडहिंग्लज- 1 लाख 15 हजार रु., राधानगरी- 4 लाख 25 हजार रु., गगनबावडा- 1 लाख 35 हजार रु., पन्हाळा- 1 लाख 92 हजार रु., हातणंगले- निरंक, भुदरगड- निरंक व आजरा- 88 हजार रु. असे एकूण 13 लाख 87 हजार रुपयांचे अंदाजित नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आजअखेर कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची आवश्यकता भासलेली नाही. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??