शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुकुमार कुरणे यांना ‘महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुकुमार कुरणे यांना ‘महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान
प्रसाद जाधव/पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेत गेली 30 वर्षे दीर्घ सेवा देणारे कर्मचारी सुकुमार मारुती कुरणे यांना ‘महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. संघराज फाउंडेशन, सावर्डे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या वतीने शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय ‘राज्यभूषण पुरस्कार’ व ‘राज्यभूषण’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संघराज फाउंडेशनतर्फे दरवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण, समाजसेवा, साहित्य, प्रशासन, उद्योग, कृषी आणि इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सुकुमार मारुती कुरणे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची विशेष दखल घेण्यात आली.
संघराज फाउंडेशनने प्रदान केलेल्या सन्मानपत्रात कुरणे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय, अविस्मरणीय, कौतुकास्पद आणि गौरवास्पद कार्य अधोरेखित करण्यात आले आहे. समाजहिताची जपणूक करत केलेल्या त्यांच्या कार्यामुळे त्यांना ‘महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. शहाजी कांबळे यांनी केले, तर अध्यक्षस्थानी मा. उत्तम कांबळे (दादा) होते. प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव सि. नागटिळे, उद्योगपती विक्रम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे, शिवाजी देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक हातकणंगलेकर, विजय द. वेटम, सद्गुरु महेशजी महाराज, शशिकांत माने, वेणूताई माने, हरिभाऊ कांबळे, दयानंद शिवजातक, अशोक पाटील, गीतांजली डोंबे आणि सरिता सासणे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमात ‘राज्यभूषण’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्याची नोंद पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे संघराज फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष तथा राज्यभूषणचे संपादक प्रा. सुशांत प्रजापती यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आनंद हबळे यांनी केले. साहित्यिका प्रा. स्वाती जंगम, समुपदेशक सौ. स्नेहा पेंढे-जकाते आणि प्रा. शीतल कांबळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
राज्यभरातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



