आपला जिल्हाताज्या घडामोडी
शतकवीर हिंदुराव आबिटकर यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव : ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने गारगोटीत समारंभ

शतकवीर हिंदुराव आबिटकर यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव :
ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने गारगोटीत समारंभ
एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क : डॉ. किरण आबिटकर गारगोटी
गारगोटी येथील हिंदुराव विष्णुपंत आबिटकर यांच्या शतकी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यात पालकमंत्री नामदार आबिटकर, बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस आदींचा समावेश आहे. हा समारंभ गारगोटी येथील के. डी. देसाई विरंगुळा केंद्रात पार पडला. अध्यक्षस्थानी भुदरगड तालुका शेतकरी संघाचे अध्यक्ष बाळ काका देसाई होते.
दीपप्रज्वलानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. हिंदुराव काकांचे औक्षण करून त्यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सभापती एच. बी. देसाई, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हिंदुराव काकांच्या सत्कारानंतर त्यांच्या बरोबरीचे ज्येष्ठ नागरिक एच बी देसाई, प्रतिष्ठित व्यापारी श्रीकांत शहा, एम आर टिपुगडे, बाळ काका देसाई, निवृत्त वनक्षेत्रपाल श्रीपतराव आबिटकर, श्रीमती शोभा खांडके, बालगंधर्व यांच्या नात श्रीमती माधुरी स्मार्त, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी राधिका पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवर उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली
श्रमाचे महत्त्व कमी होत आहे -डॉ.राजन गवस. काकांच्या पिढीत सर्वात अधिक श्रमाला प्रतिष्ठा होती. कोणाचेही फुकट घ्यायचे नाही कोणी भाकरी दिली तर तेवढे त्याचे काम करायचे, कोणाचे ऋण डोक्यावर ठेवायचे नाही, अशी भावना त्या पिढीत होती. पण आता फुकट, चंगळवाद पसरला असून श्रमाचे महत्त्व कमी झाले आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी मांडून काकांना शुभेच्छा दिल्या.
अनेकांना काकांबद्दल बोलायचे आहे पण या समारंभात वेळेअभावी शक्य होत नाही, म्हणून एक गौरवांक प्रकाशित करणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या ज्या काही आठवणी असतील त्या पाठवून द्याव्यात. त्याचे संकलन करून एक सुंदर गौरवांक प्रकाशित करण्यात येईल, असे सिंहवाणीचे संपादक किशोर आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
या समारंभात के. डी. सी. चे संचालक अर्जुन आबिटकर, अशोक आबिटकर, लखन देसाई, सौ अरुणा पाटील, टी. बी पाटील, माजी सरपंच सर्जेराव देसाई, एन जी आबिटकर, अजित आबिटकर, भीमराव आबिटकर, दत्तात्रय आबिटकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा समारंभ भुदरगड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ, के. डी. देसाई विरंगुळा केंद्र आणि सिंहवाणी लाईव्ह न्युज यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण आबिटकर यांनी केले तर सौ विदुला देवेकर यांनी आभार मानले.
वक्तशीर आहार आणि भरपूर चालणे हे काकांच्या शतकाचे रहस्य -ना. आबिटकर.
मी लहानपणापासून काकांना पाहतोय, त्यांचा योग्य वक्तशीर आणि समतोल आहार, नियमित चालणे, विनयशीलता यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभले असून आम्हाला ते पाहायला मिळाले हे भाग्य आहे, अशा शब्दात आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी काकांचे अभिष्टचिंतन केले नामदार आबिटकर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.
हिंदुराव दादा उत्तम प्रगतशील शेतकरी – के. पी. पाटील.
हिंदुराव दादांना मी माझ्या राजकीय कारकीर्दीच्या पूर्वीपासून ओळखतो. त्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत, दादा एक उत्तम प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या शतकी वाढदिवशी शुभेच्छा देणे हे माझे भाग्य समजतो. अशा शब्दात बिद्री कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त करून काकांचा सन्मान केला
गडहिंग्लजचे जेष्ठ पत्रकार सुभाष धुमे, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर पत्रकार रविराज पाटील शिवाजी पाटील आदींनी काकांना शुभेच्छा दिल्या.
संदेश वाचन.
हरियाणा येथील रेवाङी संस्थानचे राजे राव बिजेन्द्र सिंह यांचा संदेश प्रा. विशाल आहेर यांनी वाचून दाखवला.
हिंदुराव आबिटकर जी को शतकायुषी यात्रा की हार्दिक शुभकामनाएँ!
प्रेषक: राव विजेंद्रसिंग रेवाड़ी, हरियाणा.
प्राप्तकर्ता: आदरणीय हिंदुराव आबिटकर जी, गारगोटी, कोल्हापूर.
आदरणीय हिंदुराव जी,
आज आपके जीवन के 100 वें वर्ष में पदार्पण के इस पावन अवसर पर, मैं, राव विजेंद्रसिंग, रेवाड़ी (हरियाणा) से आपको हृदय की गहराइयों से बधाई देता हूँ। यह न केवल आपके परिवार के लिए, बल्कि गारगोटी और पूरे महाराष्ट्र के लिए एक प्रेरणादायक और अविस्मरणीय क्षण है। मैं ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य और लंबी आयु की कामना करता हूँ।
मुझे आज भी वर्ष 2016 की वह भेंट अच्छी तरह से याद है, जब मैं गारगोटी आया था और मुझे आपके निवास पर आकर आपसे विस्तृत चर्चा करने का सौभाग्य मिला था। आपके सादगीपूर्ण व्यक्तित्व, स्पष्टवादी विचारों और इतिहास तथा समाज के प्रति समर्पण से मैं अत्यधिक प्रभावित हुआ था। उस मुलाकात से प्राप्त आपका मार्गदर्शन और स्नेह आज भी मेरे जीवन में अमूल्य है।
आपका जीवन संघर्ष, सेवा और ज्ञान की एक जीवंत गाथा है। आपने अपने कार्यों और आचरण से अनेक पीढ़ियों के लिए एक उच्च मानक स्थापित किया है।आपका यह शताब्दी वर्ष मंगलमय हो और आपका आशीर्वाद हमें सदैव मिलता रहे।
पुनः हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं!
आपका स्नेही,
राव बिजेंद्रसिंग रेवाड़ी, हरियाणा


