संजीवन विद्यालयात वनविभागाकडून वन्यजीव सप्ताहाअंतर्गत कार्यशाळा
विद्यार्थ्यांनी पाहिले सर्प व विविध प्राण्यांबद्दलचे माहितीपट

संजीवन विद्यालयात वनविभागाकडून वन्यजीव सप्ताहाअंतर्गत कार्यशाळा.
विद्यार्थ्यांनी पाहिले सर्प व विविध प्राण्यांबद्दलचे माहितीपट
पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पन्हाळा येथील संजीवन विद्यालयात वनविभागाकडून वन्यजीव सप्ताहाअंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत वनविभागाचे परिमंडळ वनअधिकारी सागर पटकारे, वनरक्षक संदीप पाटील,योगेश पाटील व कर्मचारी शांताराम अस्वले,रंगराव उदाळे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य महेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व विषारी, निमविषारी व बिनविषारी असे सापांचे विविध प्रकार, सापांविषयी असणार्या अंधश्रद्धा व योग्य उपचार व प्रथमोपचार यांची माहिती स्लाइड – शो द्वारे विद्यार्थ्यांना दिली.
वनविभागाने राधानगरी,चांदोली, अभयारण्य परिसरातील जैवविविधता, गवा रेडा, बिबट्या, वाघ, रानडुकरे,हरीण,अस्वल आदी प्राणी-विविध प्रकारचे पक्षी,कीटक,फूलपाखरे, सरडे व अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या ध्वनिचित्रफीती दाखवल्या व विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले

आपण सर्वानी मिळून वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी , जैव विविधता टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे असा संदेश विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाद्वारे मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.


