आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहोळ तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपचा माणुसकीचा हात: अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना

मोहोळ तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपचा माणुसकीचा हात: अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना

इचलकरंजी -एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण पूर्वच्या वतीने 23424 किलो अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक साहित्याचा ट्रक रवाना करण्यात आला. “ही केवळ मदत नव्हे, तर माणुसकीचे कर्तव्य आहे,” असा भावनिक संदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिला.

या मदत उपक्रमात भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, प्रदेश महिला मोर्चा सचिव स्वाती पाटील, जिल्हा ग्रामीण पुर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी, इचलकरंजी मंडल पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम अध्यक्ष शशिकांत मोहिते, ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने, महिला मोर्चा पूर्व अध्यक्ष सीमा कमते, पश्चिम अध्यक्ष सपना भिसे, अर्चना कुडचे, दिलीप मुथा, मिश्रिलाल जाजु, सावकार मादनाईक, तानाजी पोवार युवराज माळी नरसिंह पारीक, बाळासाहेब कलगाते, शेखर शहा, युवराज माळी, प्रमोद बचाटे यांच्या प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते साहित्य मोहोळकडे रवाना करण्यात आले.

त्यामध्ये ४६६५ किलो गहू, ३९१४ किलो तांदूळ, ५६३३ किलो साखर, ४३४० किलो आटा, ४०० पुडे खाऊ बॉक्स, १ हजार पाणी बाटली, स्व. मोतीलाल चौधरीया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून जयसिंगपूर यांचेकडून १४०० किलो धान्य, ४०० साड्या, १०० बेडशीट व लहान मुलांचे कपडे

आचार्य श्री आनंद युवा मंच तर्फे १,५०० किलो आटा, १ हजार शालेय वह्या त्याचबरोबर आवश्यक प्राथमिक उपचारासाठी औषध बॉक्स त्याचबरोबर डॉ. दिपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बोरपाडळे यांच्या वतीने प्रथम उपचारासाठी डॉक्टर व सहाय्यकांची टीम रवाना करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी, मोहोळ परिसरातील नागरिक संकटात आहेत, अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात द्यावा हा आपला छोटासा प्रयत्न कोणासाठी आशेचा किरण ठरू शकतो.

आपत्तीच्या काळात माणुसकीचे भान जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पूरग्रस्त बांधवांना आधार देणे हीच खरी सेवा आहे, असे सांगितले.

संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी,भाजप सामाजिक सेवा व जबाबदारी पार पाडणारी पार्टी असून मदत साहित्य योग्य ठिकाणी पोहोचवले जाईल असे सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच महिला मोर्चा सचिव स्वाती पाटील यांनी मदतीचे हात पुढे करण्याऱ्या सेवाभावी मदतकर्त्यांचे व कार्यकर्त्यांच्या सहकार्याचे आभार मानले.

जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले जिल्हा व शहर कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या मदत ट्रकद्वारे मोहोळ परिसरातील अनेक पुरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळणार असून, भाजपचा हा उपक्रम माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणारा आहे.

 यावेळी सतिश पंडित महेश पाटील शिवानंद रावळ उमाकांत दाभोळे, अरुण कुंभार बाळकृष्ण तोतला राजेंद्र पाटील, संजय नगारे, सतिश भस्मे, पोपट पुजारी, रमा फाटक, नागुताई लोंढे, माधवी मुंढे भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??