जवाहर साखर कामगार संघटनेच्या वतीने कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार

जवाहर साखर कामगार संघटनेच्या वतीने कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार
इचलकरंजी -एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शासन दरबारी पाठपुरावा करून राज्यातील साखर कामगारांच्या 10% पगारवाढीचा अध्यादेश काढणेच्या कामात महत्वाची भूमिका बजावत पगारवाढीचा अध्यदेश काढण्यात व त्याची 1 ऑक्टोबरपासून कलाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यात अंमलबजावणी केल्याबद्दल जवाहर साखर कामगार संघटनेच्या वतीने कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यातील साखर कामगारांना 10% पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या संदर्भातील अध्यादेश शासनाने जारी न केल्याने अंमलबजावणी होण्यास विलंब होत होता. त्याचा जीआर तत्काळ काढण्यात यावा यासाठी प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने अध्यादेश काढला आहे. आक्टोंबर महिन्यापासून पगारवाढीची अंमलबजावणी सुरू झाल्याने जवाहर कारखान्यातील कामगारांना त्याचा लाभ मिळणार आहे. या यशाबद्दल तसेच जवाहर कारखान्यातील कामगारांना 20 % बोनस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने आमदार डॉ. राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले व कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, उपाध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी सेक्रेटरी शांतिनाथ चौगुले, महावीर कल्याणी, शंकर पाटील, अविनाश कांबळे, वृषभ ऐतवडे, सुरेश पवार, श्रीकांत करडे, बाबू दोड्डणावर यांच्यासह संचालक सुनील पाटील, महेश पाटील, केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे आदी उपस्थित होते.


