आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला ठामपणे विरोध*

*अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला ठामपणे विरोध*


जयसिंगपूर: वाय नवा भारत न्यूज लाईव्ह
कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खासदार व आमदार यांची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये अलमट्टी धरणाचा पाणीसाठा व उंची वाढवल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणात फटका कसा बसणार आहे याची माहिती आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री यांना दिली.
अलमट्टी धरणाच्या अगोदर हिप्परगी धरणाचीसुद्धा या बैठकीत चर्चा झाली.सदर हिप्परगी धरणासाठीचा भराव व इतर अनुषंगिक बाबी याची चर्चा झाली.
तसेच शासनाच्या पाणी साठविण्याच्या नियमाचे उल्लंघन कर्नाटक सरकार करत आहे.अलमट्टी धरणाचा पाणीसाठा व उंचीला हायकोर्ट मध्ये स्थगिती असल्यामुळे परस्पर कोणताही निर्णय होऊ नये ही बाब सुद्धा केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या निदर्शनास आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आणून दिली.
तसेच अलमट्टी धरणाच्या पाणीसाठा व उंचीला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून असणारा विरोध ठामपणे व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??