ब्रह्माकुमारीज विद्यालय शिरोळ केंद्रात रक्षाबंधन सोहळा. शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क

ब्रह्माकुमारीज विद्यालय शिरोळ केंद्रात रक्षाबंधन सोहळा.
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ऐश्वर्या विश्व विद्यालयाच्या शिरोळ केंद्रात रक्षाबंधन सोहळा व व रोटरी क्लब नवनिर्वाचित निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा आणि शिरोळ तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी श्री दत्त सहकारी कारखानाचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील तसेच कर्नल विलास सुळकुडकर भरत अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन डॉ. श्रीवर्धन पाटील, संचालक पै. विठ्ठल मोरे यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
ह्या कार्यक्रमासाठी उद्योगपती आणि रोटरी क्लबचे पीडीजी संग्राम पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी नगरसेवक पंडित काळे,रोटरीचे अमित जाधव संजय शिंदे, दिनेश माने गावडे, नितीन शेट्टी, राकेश पारिख उपस्थित होते.
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालय शिरोळ केंद्राच्या संचालिका मनीषा बहेनजी यांनी रक्षाबंधनचे आध्यात्मिक महत्त्व व सत्कार याविषयी प्रबोधन केले. सहकार महर्षी गणपतराव पाटील, व उद्योगपती संग्राम पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आजी-माजी सैनिक संघटना शिरोळ यांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ऋतुजा शेट्टी यांनी केले.